देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणारआहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायकआहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांतशिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्चपेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशाविद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मकबदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्याप्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्रविषयाचा अभ्यास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे,एक तर तिथे मानसशास्त्राचे प्राध्यापक राहिले नाहीतआणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तिथे प्रवेश घेणे बंद केले. अखेर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमच बंद करून टाकला. दुसऱ्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका सांगतात की,त्यांच्याकडे बॅचलर स्तरावरील विविध कोर्सेसमध्ये हिंदीचे 3,000 विद्यार्थी आहेत, पण त्यांना शिकवणारी केवळएकच शिक्षिका आहे. ही माहिती काही अपवादात्मक नाही. एके काळी सरकारी विद्यापीठांत उत्तम प्राध्यापक असायचे. गोंधळ असूनहीविद्यार्थी तिथे अभ्यास करायचे. तो गोंधळही त्यांच्याव्यक्तिमत्व विकासात काही प्रमाणात भरच घालायचा. तेविद्यार्थी आपल्या विषयातील तज्ज्ञतेसाठी जगभरात नावकमवायचे. पण हळूहळू या यंत्रणेला गंज लागला.कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर नाही, तर राजकीय कृपेच्याआधारावर होऊ लागली. आता तर प्राध्यापकांच्या निवडप्रक्रियेतही उमेदवार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचासमर्थक असावा, हीच कसोटी लावली जाते. पूर्वी असे म्हटले जायचे की, विद्यापीठे अशी ठिकाणेआहेत जिथे 15-16 वर्षांचे अनेक संभाव्य गुन्हेगार प्रवेशघेतात, पण पुढच्या चार-पाच वर्षांत ते जबाबदार नागरिकबनून बाहेर पडतात. या ठिकाणी त्यांना विविध विषयांचेज्ञान मिळायचे, राजकीय समज मिळायची, काही लक्षातराहण्याजोगे प्राध्यापक मिळायचे, काही आंदोलनांच्याआणि काही खोड्यांच्या आठवणी मिळायच्या. त्यांच्याव्यक्तिमत्त्वात काही टोकाची तीव्रता असेल, तर तिलाघासून-पुसून माणुसकीचे रूप देण्याचे काम तिथे व्हायचे. पण आता शिक्षण हा एक व्यापार बनला आहे. आताबारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले विद्यापीठांत नाही, तरतांत्रिक संस्थांमध्ये जात आहेत. तिथे चार वर्षांत पदवीघेऊन त्यांना एक चकाकणारी नोकरी मिळवायची असते.त्यांना देश, समाज किंवा जीवनाबद्दल काहीही विचारकरायचा नसतो, कोणत्याही आदर्शाच्या मागे लागायचेनसते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि कॅम्पससिलेक्शनद्वारे कुठेतरी नोकरी मिळवून बाहेर पडायचे,एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसते. विद्यापीठेही चांगले नागरिक घडवणारे कारखाने असतात. हेनागरिकत्व रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षाइतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रअभ्यासल्यामुळे येते, ज्याला ‘आर्ट्स फॅकल्टी’ किंवामानविकी विभाग म्हणतात. सर्वात जास्त दुर्दशा याचविभागाची झाली आहे. नेहमी असे मानले जाते की हुशारमुले सायन्स घेतात, पण गेल्या काही वर्षांत आर्ट्स च्याशिक्षणाला जणू धुळीत मिळवून टाकले आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये येणाऱ्या इतिहास, भूगोल किंवाराज्यशास्त्राच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याचे काम आताकोचिंग संस्था करत आहेत.भारतात शालेय शिक्षणआधीपासूनच सामाजिक विषमतेचा आधार राहिले आहे,पण आता महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंतही हाशैक्षणिक विषमतेचा सिलसिला पोहोचला आहे. खासगीविद्यापीठांची चमकधमक खूप आहे, पण तिथे नाशिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, ना विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञानमिळते. या अंधारात काजव्यासारखे येणारे विदेशीविद्यापीठ आपल्या उच्च शिक्षणाचे खरे संकट कितीसोडवू शकतील, हा एक मोठा प्रश्न आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विद्यापीठे म्हणजे चांगले नागरिक घडवणारेकारखाने असतात. हे नागरिकत्व रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासल्यामुळेयेते, ज्याला आर्ट्स फॅकल्टी किंवा ‘मानविकीशाखा विभाग म्हटले जाते. मात्र, सर्वात जास्तदुर्दशा याच विभागाची झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




