इतर देशांनी भारतीयांचे स्वागत करावे, त्यांना कायमस्वरूपी वास्तव्याचा हक्क द्यावा आणि अखेरीस नागरिकत्वही द्यावे, अशी आपली अपेक्षा असते. मात्र भारताच्या स्वतःच्या नागरिकत्व कायद्यांमध्ये तितकाच खुला दृष्टिकोन आहे का, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. स्थलांतरितांच्या हक्कांबाबतची आपली चिंता अनेकदा स्वतःच्या सीमांपर्यंतच मर्यादित राहते. हा विरोधाभास स्पष्टपणे दिसून आला. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला कार्यकारी आदेश जारी केला. या आदेशाद्वारे बेकायदा स्थलांतरित व तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप मिळणारे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद करण्यात आली. भारतीय माध्यमांच्या एका वर्गाने या आदेशावर टीका करत, तो अमेरिकेच्या स्थलांतरितांना सामावून घेणाऱ्या परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले. त्यानंतर 30 जून 2026 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा हा आदेश बेकायदा ठरवला. बहुतांश भारतीयांनी या निर्णयाचे निष्पक्षता व कायद्याच्या राज्याचा विजय म्हणून स्वागत केले. मात्र या आनंदात एका अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले. ते म्हणजे भारताने स्वतः अनेक वर्षांपूर्वी जन्मसिद्ध नागरिकत्वाची व्यवस्था संपुष्टात आणली आहे. संविधान तयार होत असताना भारतातही जन्माने नागरिकत्व मिळण्याची व्यवस्था होती. 1955 च्या मूळ नागरिकत्व कायद्यानुसार 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती, तिच्या पालकांचे नागरिकत्व काहीही असले तरी जन्माने भारतीय नागरिक मानली जात होती. यात काही मर्यादित अपवाद होते. उदाहरणार्थ- राजनैतिक अधिकाऱ्यांची किंवा शत्रुराष्ट्रांच्या नागरिकांची मुले. मात्र काळानुसार 1986 आणि त्यानंतर 2003 मधील दुरुस्त्यांद्वारे या कायद्याची व्याप्ती मर्यादित करण्यात आली. ट्रम्प यांच्या आदेशावर आपण तीव्र विरोध व्यक्त केला, पण आपल्या स्वतःच्या कायद्याबाबत मात्र मौन बाळगले. 1986 च्या दुरुस्तीने भारताच्या संसदेने जन्मसिद्ध नागरिकत्वाची व्यवस्था समाप्त केली. त्यानुसार 1 जुलै 1987 किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीला नागरिकत्व मिळण्यासाठी त्याच्या पालकांपैकी किमान एक भारतीय नागरिक असणे आवश्यक ठरले. 2003 मध्ये या कायद्यात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असला, तरीही त्या व्यक्तीला आपोआप नागरिकत्व मिळत नाही. त्यासाठी दुसरा पालक बेकायदा स्थलांतरित नसणेही आवश्यक आहे. म्हणजेच पालकांपैकी एक भारतीय असला आणि आजी-आजोबांपासून कुटुंब भारतातच राहत असले तरीही आपोआप नागरिकत्व मिळेल, याची हमी नाही. या दुरुस्त्यांमागे भारतातील बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांबाबतच्या चिंता होत्या. मात्र भारतातील अशा स्थलांतरितांची संख्या व अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या लोकांची संख्या यांची तुलना केली तर भारतातील आकडे तुलनेने कमी असल्याचे अनेक अंदाज दर्शवतात. याशिवाय भारतात नागरिकत्व मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया सोपी नाही. नागरिकत्वासाठी भारतात जगातील कठोर अटींपैकी काही अटी लागू आहेत. सामान्यपणे परदेशी नागरिकाला अर्ज करण्यास पात्र होण्यापूर्वी सात वर्षे भारतात वास्तव्यास राहावे लागते आणि त्यानंतरही नागरिकत्व देणे हे पूर्णपणे सरकारच्या विवेकाधिकारावर अवलंबून असते. भारतीय नागरिकाशी विवाह झाला तरी आपोआप नागरिकत्व मिळत नाही. परदेशात जन्मलेल्या जोडीदारालाही नागरिक म्हणून नोंदणी करण्यापूर्वी दीर्घकालीन वास्तव्यासंबंधीच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. भारतात अनेक पिढ्यांपासून राहणारी हजारो तिबेटी कुटुंबे या विसंगतीचे उदाहरण आहेत. त्यांपैकी अनेकांचा जन्म भारतात झाला. त्यांनी भारतीय शाळांमध्ये शिक्षण घेतले. भारतीय भाषा आत्मसात केल्या आणि भारताशिवाय दुसरा कोणताही देश आपले घर मानत नाहीत. तरीही कायदा त्यांना आपोआप भारतीय नागरिकत्व देत नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये तिबेटी निर्वासित व त्यांच्या वंशजांसाठी जागा राखीव असतात. मात्र भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनाही दीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रशासकीय प्रक्रियेतून जावे लागते.्र (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) प्रत्येक देशाला आपला नागरिक कोण होईल, हे ठरवण्याचा अधिकार आहे. मात्र बौद्धिक प्रामाणिकपणाच्या अपेक्षेनुसार इतरांसाठी लावलेल्या निकषांवर आपण स्वतःलाही तपासले पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

कसबा गणपती मंदिरात चोरी; देणगीपेटी फोडून ₹६० हजार लंपास!
अल्पवयीन मुलीच्या खुनाबाबत ‘AI’ आणि ‘व्यसन’च्या बातम्या चुकीच्या; DYSP विपुल पाटील!
तब्बल ७ मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई; महापालिकेच्या कारभारावर सवाल!
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


