नंदितेश निलय यांचा कॉलम:चॅम्पियन माइंडसेट म्हणजे काय? आयुष्यात योग्य तत्त्वांसह जिंकायला हवे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन नक्कीच बनता येते. पण‎रोल मॉडेल म्हणून टिकून राहण्यासाठी काळ तुमचे‎मूल्यमापन जीवनमूल्यांच्या आधारावर करते. रोल मॉडेल‎बनणे म्हणजे कुटुंबाकडे परत वळून आपल्या‎जीवनमूल्यांची आठवण ठेवणे आणि ती जपणे, याशी‎तुम्हीही सहमत असालच. हे अधिक समजून घेण्यासाठी‎आपल्याला मिरका फेडरर यांचे एक भाषण समजून‎घेतले पाहिजे. त्यांनी 29 ऑगस्ट 2026 रोजी हॉल ऑफ‎फेममध्ये समाविष्ट होण्यासाठी पती, टेनिसचे दिग्गज‎रॉजर फेडरर यांची ओळख करून देताना दिले होते.‎ मिरका म्हणाल्या, "माझा विश्वास ठेवा, मी त्यांची‎मेहनत, तासन्‌तास केलेला सराव, त्यांचे अनुशासन‎आणि समर्पण पाहिले आहे. हे सर्व इतके सोपे वाटते, त्यागो‎ष्टी मी जवळून पाहिले आहे. त्यांचे हजारांहून अधिक‎सामने पाहिल्यानंतरही मी नेहमी थक्क व्हायचे. पण या‎खेळाडूमागचा माणूस कमाल आहे. त्यांचे आई-वडील‎त्यांना एक लाडका मुलगा म्हणून ओळखतात. त्यांची‎बहीण त्यांना एक उत्तम भाऊ मानते. त्यांचे मित्र त्यांना‎अशा व्यक्तीच्या रूपात ओळखतात, ज्यांच्याकडे‎कितीही व्यग्रता असली तरी मित्रांसाठी नेहमी वेळ‎असतो. हे गुण काही अचानक आले नाहीत. त्यांनी या‎गोष्टी आई-वडिलांकडून शिकल्या. आई-वडिलांनी‎त्यांना नम्रता, कृतज्ञता, दयाळूपणा शिकवला. सर्वांशी‎समान आदराने वागण्याची शिकवण दिली.’ पुढे त्या‎म्हणाल्या, "जगाला रॉजर फेडरर कोण आहेत हे‎समजण्यापूर्वीच, रॉबी, लिनेट यांनी (रोजर यांचे‎आई-वडील) मला एक व्यक्ती दिली. तिचे मी अधिक‎कौतुक करते : माझा सोबती रॉजर, मित्र रॉजर आणि‎सरतेशेवटी एक पती व बाबा रॉजर. सध्याच्या काळात‎सर्व काही विस्कळीत होत आहे. माणूस म्हणून जगणे‎अनावश्यक , ओझे वाटू लागले आहे. तेथे कुटुंबात एकत्र‎राहणे आणि आई-वडिलांना समजून घेणे कठीण आहे..‎अशा काळात स्वित्झर्लंडचे हिरो रॉजर फेडरर यांच्या‎कौटुंबिक मुळांची भक्कम पकड पाहणे सुखावणारे आहे.‎खरा चॅम्पियन हा आधी आणि शेवटपर्यंत एक चांगला‎माणूसच असतो, हा विश्वास यामुळे अधिक दृढ होतो.‎दुसरीकडे, रॉजर फेडररसुद्धा हे मान्य करतो की मिरका‎नसत्या तर ते इतके चिंतामुक्त होऊन प्रदीर्घ काळ टेनिस‎खेळू शकले नसते. रॉजरचे ‘रॉजर फेडरर'' होण्यात‎त्यांच्या कुटुंबाचीच मोठी भूमिका राहिली. ज्युनिअर‎खेळाडू असताना ते रागवायचे किंवा रॅकेट फेकायचे,‎तेव्हाही त्यांचे आई-वडील त्यांना शांत राहून खेळाचा‎आदर करायला शिकवायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे‎तर, "आज मी जो काही आहे, तो माझ्या‎आई-वडिलांच्या बिनशर्त प्रेम, पाठिंब्यामुळेच आहे."‎टेनिसमधील रॉजर फेडरर यांच्याप्रमाणेच क्रिकेट ‎मधील‎दंतकथा सचिन तेंडुलकरनेही नुकत्याच झालेल्या शिक्षक‎दिनानिमित्त वडिलांच्या आठवणीत एका फेलोशिपची‎घोषणा केली. या प्रसंगी तो बरेच काही सांगून गेला. त्याचे‎वडील त्याला नेहमी आठवण करून द्यायचे की, अपयश‎ठीक आहे. पण शॉर्टकट योग्य नाही. खेळात किंवा कुठेही‎फसवणूक करणे चुकीचे आहे. लोक तुमचे शतकांचे‎विक्रम विसरून जातील, पण तुम्ही किती चांगले माणूस‎होतात आणि समाजासाठी काय केले, हेच नेहमी लक्षात‎ठेवले जाईल. थोडक्यात सांगायचे तर कुटुंबातही‎मानवतेचे चॅम्पियन असतात. तेच खरे खरे चॅम्पियन‎आणि रोल मॉडेल बनतात. रॉजर असोत वा सचिन यांना‎म्हणूनच जग चॅम्पियन आणि रोल मॉडेल म्हणून लक्षात‎ठेवते. दुसरीकडे ते कुटुंबाने शिकवलेली जीवनमूल्ये‎कधीही विसरत नाहीत. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यश‎आणि प्रसिद्धी जेव्हा डोक्यात जाते. तेव्हा कृतज्ञता,‎साधेपणा, नम्रता आणि चांगुलपणा आपल्या वर्तनात‎टिकवून ठेवणे सोपे नसते. सतत एक चांगला माणूस बनून‎राहणे, हाच खऱ्या अर्थाने चॅम्पियन माइंडसेट आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *