धनंजय देशमुख, कृष्णा आंधळे, संतोष देशमुखImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Dhananjay Deshmukh on Krushna Andhale: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य हादरले होते. या क्रूर हत्येनंतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राज्यात अनेक मोर्चे निघाले. दबावानंतर पोलीस प्रशासन हालले. तपास यंत्रणा जागी झाल्या. प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली. वाल्मिक कराड हा या कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला. या खून प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो जिवंत आहे की त्याचा गेम झाला याविषयी शंका व्यक्त होत होत्या. पण त्याच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.
सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर आणणार
मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला दिला होता.त्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. पुढील सुनावणी त सर्व साक्षीदारांची यादी देण्यात येणार आहे आता जो डिले करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून त्यांनी केलेला होता. एक तर त्यांना चार्ज प्रेम होऊ द्यायचं नव्हतं. आता या प्रकरणी दोषारोप झाला आहे.लवकरच साक्षी पुराव्याची यादी दिली जाणार आहे.लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी अशी माझी मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
येत्या सहा तारखेला होणाऱ्या सुनावणीत आम्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याविषयी पाठपुरावा करण्यास कुठे कमी पडणार नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांनी याचा पाठपुरावा केला आहे. जे सीज केलेले अकाउंट आहेत. ते लवकरच जप्त करण्यात यावेत यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, असे धनंजय देशमुखांनी स्पष्ट केले.
फरार कृष्णा आंधळे तीन वेळा गावात
फरार कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला. चालू सहा महिन्यात ही माहिती आम्हाला मिळाली आहे. ती आम्ही सीआयडी कार्यालयाला कळवली आहे. कृष्णा तीनवेळ गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केलं आहे की आरोपी गावात येऊन गेला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. पण आरोपी मोबाईल वापरत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात अडचण येत आहे.
यावर काय करायचं आणि कशा पद्धतीत त्या आरोपीला जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करू. कारण या आरोपापासून आमच्या सर्व कुटुंबाला जीवितास धोका आहे. हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सर्व लोक आहेत. आम्ही ही मागणी केली आहे लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी. आणि त्याला जेरबंद करावे अशी आमची मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
[embedded content]
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




