1 डिसेंबर 1978 हा माझ्या पहिल्या पगाराचा दिवस होता. मी तो पगार आईच्या हातात दिला, तिने तो देवापुढे ठेवला. त्यानंतर तो वडिलांकडे दिला. वडिलांनी विचारले, ‘तुला या पैशांचे काय करायचे आहे?’ त्या एका प्रश्नाने क्षणात माझ्या मनातील त्या लहान मुलाला एकदम मोठे करून टाकले. मला जाणवले की वडील आता कोणत्याही लहान मुलाशी नाही, तर स्वतःच्या बरोबरीच्या व्यक्तीशी बोलत आहेत. हे काही माझा पगार त्यांच्यापेक्षा जास्त होता म्हणून नव्हे, तर आता मीसुद्धा कमावता झालो होतो. त्यांनी सुचवले, ‘तू स्वतःसाठी, आईसाठी आणि बहिणीसाठी काहीतरी खरेदी कर.’ त्यानंतर तो संवाद आला ज्याने सर्वकाही बदलून टाकले- ‘जानेवारीपासून तू घर चालवशील. मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी बचत करेन.’ मी होकारार्थी मान डोलावली. त्या रात्रीचे जेवण हे आयुष्यातील सर्वात संस्मरणीय जेवणांपैकी एक ठरले. त्यानंतर त्यांनी घरातल्या प्रत्येक खर्चाची माहिती मला राहील आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये माझा सल्ला घेतला जाईल, याची पूर्ण काळजी घेतली. जेव्हा जेव्हा मी काही न बोलता प्रश्नार्थक नजरेने पाहायचो- ‘तुम्ही माझ्याकडून हे सांभाळण्याची अपेक्षा कशी करू शकता?’ तेव्हा ते फक्त डोळे आणि मान थोडी उजवीकडे वळवायचे. त्याचा स्पष्ट अर्थ असायचा: ‘हे तुलाच करायचे आहे.’ मुलांमध्ये लढाऊ वृत्ती आणि कणखरपणा निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या सोपवणे अत्यंत आवश्यक असते, असा माझ्या वडिलांचा ठाम विश्वास होता. हा धडा आजच्या काळात अधिक प्रस्तुत आणि समर्पक ठरतो. मध्य प्रदेशातील खंडवा येथील माझे सहकारी उदय मंडलोई यांच्या मुलाने अहमदाबादमधील वार्षिक 10 लाख रुपये वा बंगळुरूमधील 12 लाख रुपयांऐवजी 9 लाख रुपयांची ‘वर्क-फ्रॉम-होम’ नोकरी स्वीकारली. हा समजूतदार निर्णय असू शकतो. मात्र, उदय यांच्यावर यापेक्षाही मोठी जबाबदारी येते: ती म्हणजे कमावता मुलगा घरात एक प्रवासी बनून राहणार नाही, याची खबरदारी घेणे. आता हळूहळू त्याच्या हातात वाहनाचे स्टिअरिंग व्हील सोपवण्याची वेळ आली आहे; जसे मला स्वावलंबी बनवण्यासाठी माझ्या वडिलांनी केले होते. मॅनेजमेंट टिप: जेव्हा मूल कमवायला लागते, तेव्हा केवळ आनंदोत्सव साजरा करू नका. त्याच्यावर जबाबदारी निश्चित करा. पगार त्याला कमावता बनवतो; पण जबाबदारी मुलाला परिपक्व बनवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




