सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बहुतेक विद्यार्थी कॉलेजच्या नव्या वातावरणाशी जुळवून घेतात. हा रोमांचक टप्पा अनेक जबाबदाऱ्यांसह येतो. यात पैशांचे व्यवस्थापन शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉलेजची ही वर्षे चांगल्या आर्थिक सवयींचा पाया घालण्यासाठी योग्य काळ ठरू शकतात. त्याविषयीच्या काही गोष्टी समजून घेऊया... बजेट बनवण्यास सुरुवात करा कॉलेजच्या दिवसांत पैसे विविध मार्गांनी येऊ शकतात. कुटुंबाकडून मिळणारी रक्कम, अर्धवेळ कामातून मिळणारे उत्पन्न आणि शिष्यवृत्ती याद्वारे पैसे मिळू शकतात. मात्र, छोट्या-छोट्या खर्चांमध्ये पैसे कधी संपून जातात, हे समजतच नाही. त्यामुळे पैसे कुठून येत आहेत आणि कुठे खर्च होत आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या ॲपमध्ये किंवा स्प्रेडशीटमध्ये दैनंदिन खर्चाची नोंद ठेवा. बचत करा विद्यार्थ्यांना अतिरिक्त कमाई करणे नेहमीच सोपे नसते. तरीही अगदी छोट्या रकमेपासून बचतीची सुरुवात केली जाऊ शकते. हळूहळू आपत्कालीन निधी तयार केल्यास अचानक उद्भवणाऱ्या खर्चांपासून बचाव होऊ शकतो. या वयात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आकर्षण असू शकते, पण जोखीम समजून घेतल्याशिवाय घाई करू नका. शैक्षणिक कर्ज नियोजन आत्तापासूनच करा जर शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर परतफेडीचे नियोजन शिक्षण सुरू असतानाच करा. व्याज किती, हप्ता कधी सुरू होईल, परतफेडीच्या अटी काय, हे समजून घेण्यासाठी पहिल्या पगाराची वाट पाहू नका. जितक्या लवकर तुम्ही कर्जाचे स्वरूप समजून घ्याल, तितकेच पुढे जाऊन त्याचे नियोजन करणे सोपे जाईल. चांगला क्रेडिट स्कोअर तयार करा आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग माध्यमांचा वापर करा. बिले व इतर देणी वेळेवर भरा. चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी हा योग्य काळ आहे. भविष्यात चांगला क्रेडिट स्कोअर उपयुक्त ठरू शकतो. चूक झाल्यास स्वतःला माफ करायला शिका चूका होणे हा शिकण्याचाच एक भाग आहे. पैशांच्या बाबतीतही चूक घडू शकते. चूक झाल्यास ती लपवण्याऐवजी आई-वडील/ विश्वासू व्यक्तीशी बोला आणि एकत्र मिळून त्यावर मार्ग काढा. पालकांसाठी सल्ला मुलाने पैशांशी संबंधित चुकीबद्दल सांगितले तर शांतपणे ऐकून घ्या. रागवू नका. रागवल्यामुळे ते चुका लपवू लागतात. आपला उद्देश घाबरवणे नसून, जबाबदारीने पैशांचे व्यवस्थापन करायला शिकवणे असावा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




