पुणे: राज्य सरकारच्या आरक्षणासंदर्भातील धोरणांविरोधात आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी १ सप्टेंबर रोजी 'चलो मुंबई' आंदोलनाची हाक ओबीसी हक्क आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. राज्यातील ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने मुंबईत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी मंगळवारी (१८) इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
हाके यांनी राज्य सरकार, महायुतीचे नेते तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. जात पडताळणी समित्यांवर दबाव आणणे किंवा त्यांच्या कामकाजावर राजकीय पद्धतीने टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भातील अध्यादेश आणि सरकारच्या भूमिकेबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी हाके यांनी केली. 'सगेसोयरे' किंवा अन्य कोणत्याही मार्गाने ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी
आगामी जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र आणि अधिकृत नोंद व्हावी, अशी मागणी हाके यांनी केली. ओबीसींची लोकसंख्या आणि सामाजिक स्थितीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको'
ज्यांना आरक्षण द्यायचे आहे, त्यांना सरकारने आरक्षण द्यावे; मात्र त्यासाठी ओबीसींच्या विद्यमान आरक्षणावर परिणाम होता कामा नये, अशी भूमिका हाके यांनी मांडली. ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास समाज व्यापक आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला पोपटराव पवार, तानाजी धोत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




