पुणे: खेड तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याची एक अत्यंत लक्षवेधी घटना समोर आली आहे. राजगुरुनगर ते खरपुडी या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे होत असलेल्या हालखातींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, एका सामाजिक कार्यकर्त्यांने चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून अनोखे 'मुंडन आंदोलन' केले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजगुरुनगर ते खरपुडी तसेच होलेवाडी ते खरपुडी यादरम्यानचा सुमारे सात किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठे आणि धोकादायक खड्डे पडले आहेत. हा मार्ग नेहमी अत्यंत वर्दळीचा असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुले, महिला, कामगार वर्ग आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या दुरवस्थेमुळे येथे सतत लहान-मोठे अपघात होत असून जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आणि कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. अखेर प्रशासनाला गाढ झोपेतून जागे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध निवेदक लक्ष्मण औताडे यांनी खरपुडी (ता. खेड) येथे रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात बसून स्वतःचे मुंडन करून घेतले आणि या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
या अनोख्या आंदोलनामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, जर प्रशासनाने यावर तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही आणि रस्ता दुरुस्त केला नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहर
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले

























Subscribe to my channel



