मुंबईहून सुरतच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या आरावली एक्सप्रेसमध्ये (Aravali Express) एक अतिशय खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. ३१ वर्षीय मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी हिच्यावर स्लीपर तिकिटावर एसी डब्यात प्रवास करण्यावरून झालेल्या वादानंतर, चालत्या ट्रेनमध्ये आरपीएफ (RPF) जवानावर आणि तिकीट तपासनीसावर रेझर ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वर्तुळात आणि प्रवाशांमध्ये एकच दहशत पसरली होती.
प्राप्त सविस्तर माहितीनुसार, मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी ही एका शूटिंगच्या निमित्ताने बांद्रा-गंगानगर आरावली एक्सप्रेसने सुरतला जात होती. तिच्याकडे केवळ स्लीपर क्लासचे तिकीट होते, मात्र ती आरक्षित एसी डब्यात (AC Coach) जाऊन बसली होती. बोरिवली ते डहाणू यादरम्यानच्या प्रवासात रात्री साडेअकराच्या सुमारास एका सहप्रवाशाने तिला तिच्या जागेवरून उठण्यास सांगितले, कारण ती जागा त्या प्रवाशासाठी आरक्षित होती. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने प्रवाशाने तिकीट तपासनीस (TC) आणि रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) याची माहिती दिली.
जेव्हा आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी तिथे पोहोचले, तेव्हा आरोपी महिला अत्यंत आक्रमक झाली. तिने सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने अचानक अंगावरील कपडे काढत रेल्वेच्या डब्यात हायव्होल्टेज ड्रामा आणि प्रचंड गोंधळ घातला. इतकेच नाही तर, तिने आपल्या पिशवीतून एक धारदार रेझर ब्लेड बाहेर काढले आणि आरपीएफ जवानांवर व स्वतःवर वार करून स्वतःलाच जखमी करून घेतले. या झटापटीत जवानाचा गणवेश फाटला, मोबाईल फोन आणि चष्मा तुटला. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी डब्याचे दरवाजे सुरक्षितपणे बंद करून तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तिने धावत्या ट्रेनमधील काच फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ट्रेन डहाणू रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिला खाली उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले. बोरिवली रेल्वे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर काही प्रसारमाध्यमांनी 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री अंतरा बॅनर्जी हिचा फोटो चुकीने वापरल्यामुळे नावाच्या संभ्रमावरून मोठा गैरसमज निर्माण झाला होता, ज्यावर अभिनेत्रीच्या जनसंपर्क पथकाने स्पष्टीकरण दिले.
शहर
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




