
Pune : राजस्थानातून टप्प्याटप्प्याने पुण्यात मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. खराडी पोलिसांसह गुन्हे शाखेने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी ९२ लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ‘परिमंडळ सात’चे उपायुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये मोतीसिंह राजपुरोहित (वय २८), हरीश रामदेवासी (२२, दोघेही रा. वाघोली), योगेश उर्फ मनीष बिश्नोई (३०, रा. चामु, जि. जोधपूर, राजस्थान), सचिन उर्फ एस. के. बिश्नोई (२०), अमित घुले (४०, रा. मांजरी) आणि रतनलाल जाठ (२०) आणि रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (३४) यांचा समावेश आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुरवठादार, वितरक आणि किरकोळ एजंट यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असताना मोतीसिंह आणि हरीश यांना १२ लाख रुपयांच्या एमडी विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हा ड्रग्ज राजस्थानातून आणत असल्याची कबुली दिली.
राजस्थानातून पुण्यात योगेश बिश्नोई एमडी विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वाघोली परिसरातून १५१ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. सचिन बिश्नोईला मांजरी भागात पकडून त्याच्याकडून चार लाख ६५ हजार रुपयांचा एमडी जप्त केले. सचिनने मांजरीतील अमित घुले याला ७९ लाख रुपये किमतीचे ३९८ ग्रॅम एमडी विकले. अमित घुले यालाही अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने राजस्थानात जाऊन छापेमारी करून मुख्य एमडी पुरवठादार रतनलाल जाठला अटक केली. पुण्यातील एमडी प्रकरणात फरारी असलेल्या रामकरण जाठ यालाही ताब्यात घेण्यात आले.
किरकोळ विक्रीच्या आडून ड्रग्ज विक्री
मोतीसिंह वाघोलीत गिफ्ट हाउस चालवत होता, तर हरीशने मोबाइल शॉपी सुरू केली होती. या व्यवसायाच्या आडून ते गेल्या वर्षभरापासून एमडीची विक्री करीत होते, अशी माहिती उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
पावणेचार कोटींचे एमडी जप्त
-पोलिसांनी एका कारवाईतून विक्री ते पुरवठा अशी संपूर्ण साखळी उघडकीस आणली.
-आतापर्यंत सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून १,९६० ग्रॅम एमडी (किंमत तीन कोटी ९२ लाख रुपये) जप्त करण्यात आला आहे.
-मोबाइल, महागडी कार आणि इतर साहित्य असा एकूण चार कोटी २७लाख रुपयांचा ऐवज जप्त.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




