तिरंग्याच्या रंगात न्हाले धरण! स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालखेड व करंजवण धरणावर मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरण समूहातील महत्त्वाच्या अशा पालखेड व करंजवण धरणांवर अत्यंत आकर्षक आणि मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यमहोत्सवाचा उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण अधिक वाढवण्यासाठी प्रशासनाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या विशेष रोषणाईमुळे भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगांच्या झगमगत्या प्रकाशाने उजळलेली धरणांची भव्य रचना आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत देखणा दिसत असून, रात्रीच्या वेळी हा नजराणा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. धरणाच्या भिंतींवर आणि पाणी साठ्याकडील परिसरामध्ये करण्यात आलेल्या या तिरंगी रोषणाईमुळे संपूर्ण धरण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, हा परिसर सध्या स्थानिकांचे आणि पर्यटकांचे मुख्य केंद्र बनले आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *