पुणे: शहरामध्ये रस्त्यांवर आणि विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर वारंवार बेवारसपणे पडून राहिलेल्या वाहनांच्या समस्येवर पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण व कडक पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे शहरात विविध कारणांमुळे जप्त करण्यात आलेली आणि बेवारस म्हणून धूळ खात पडलेली तब्बल १ हजार ३१७ वाहने आता जाहीर लिलावाद्वारे (Public Auction) विल्हेवाट लावली जाणार आहेत. या संदर्भात पुणे शहर वाहतूक शाखेने अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, या कारवाईमुळे शहरात बेवारस वाहनांमुळे होणारी विनाकारण जागा अडवणूक आणि पार्किंगच्या समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुणे शहर व उपनगरांच्या हद्दीमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाहने विविध दुर्घटना, गुन्हेगारी प्रकरणे, बेवारस स्थिती किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या कारणांमुळे जप्त करण्यात आली होती. अनेक वाहनमालक आपली वाहने सोडवण्यासाठी पुढे आलेच नाहीत, ज्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात आणि राखीव जागांवर या बेवारस वाहनांचे ढीग साचले होते. यामुळे जागेचा अपव्यय होत असून परिसराचे सौंदर्यही बिघडत होते. यावर तोगाडा काढण्यासाठी वाहतूक विभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या सर्व १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, या लिलावापूर्वी वाहनमालकांना एक अखेरची संधी देण्यात आली आहे. संबंधित वाहनावर किंवा या जप्त केलेल्या वाहनांपैकी कोणतीही गाडी आपली असल्याचे सिद्ध करण्यासाठी वाहनमालकांना मालकी हक्क दाखवावा लागणार आहे. प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित वाहनमालकाने आवश्यक ती सर्व कायदेशीर कागदपत्रे, पासिंग, आरसी बुक (RC Book) आणि ओळखीचे पुरावे घेऊन संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षकांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. आणि आपला अर्ज सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
जर ठरवून दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत कोणीही मालक आपल्या वाहनावर हक्क सांगण्यासाठी पुढे आला नाही, किंवा वैध कागदपत्रे सादर केली नाहीत, तर ही सर्व वाहने नियमानुसार शासकीय लिलाव प्रक्रियेद्वारे विकली जातील, असा स्पष्ट इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. पुणे शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि बेवारस वाहनांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वाहनधारकांनी आणि नागरिकांनी यासंदर्भात लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
महाराष्ट्र
- नांदेड: हळदीने गाठला विक्रमी उच्चांक! बाजार समितीत भाव थेट २२ हजार २०० रुपयांवर; वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!



























Subscribe to my channel




