मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाच्या फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठ्याचा (Cardboard) आधार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत राहणारे राम सोनी यांचा पाय गुरुवारी फ्रॅक्चर झाला होता. त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा अजय याने तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एक्स-रे केल्यानंतर पायाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना प्लास्टर उपलब्ध नसल्याचे सांगून गोंधळात टाकले. त्यानंतर प्लास्टर बाहेरून आणण्यासाठी ८०० रुपये लागतील, पण जर मला ४०० रुपये दिले तर मी हे काम करून देतो, अशी थेट लाच मागितल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या मुलाने केला आहे.
या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या सोनी कुटुंबीयांनी मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे आणि कपिल पवार यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "रुक्मिणीबाई रुग्णालयात प्लास्टरचा साठा उपलब्ध आहे. तरीही ही घटना नेमकी कशी घडली आणि कर्मचाऱ्यांनी असे कृत्य का केले, याची सखोल चौकशी केली जाईल."
रुक्मिणीबाई रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही एका मुलाच्या शरीरात इंजेक्शनची सुई तुटून अडकल्याची घटना, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने महिलेचा झालेला मृत्यू, एका रुग्णाच्या गोळीत तांब्याची तार आढळणे आणि प्रसूतीसाठी वेळेत दाखल करून न घेतल्यामुळे रुग्णालयाच्या दारात झालेली प्रसूती अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे या रुग्णालयाचा कारभार वारंवार वादात सापडला आहे. वारंवार घडणाऱ्या या गंभीर चुकांमुळे केडीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
























Subscribe to my channel




