गेल्या महिन्यात माझे एक स्वप्न पूर्ण झाले. मला स्पेनमधील बास्क येथे ‘मोंड्रागॉन वर्कर को-ऑपरेटिव्हज’ (मजूर सहकारी संस्था) पाहण्याची संधी मिळाली. हे जगातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक प्रयोगांपैकी एक आहे. मोंड्रागॉन ग्रुप हा 100 हून अधिक सहकारी संस्थांचा एक संघ आहे. यापैकी अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. त्या सायकल, लिफ्ट, ऑटो पार्ट््स आणि घरगुती उपकरणांसारख्या अनेक वस्तू बनवतात. इतर सहकारी संस्था वित्तीय सेवा, खानपान सेवा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि वृद्धांची देखभाल यांसारख्या सेवा पुरवतात. मोंड्रागॉन को-ऑपरेटिव्हजमध्ये एकूण सुमारे 80,000 कर्मचारी काम करतात. मोंड्रागॉन ग्रुपने अनेक अशा सहायक संस्था बनवल्या आहेत, ज्या वर्कर को-ऑपरेटिव्हजना वाढण्यास मदत करतात. मोंड्रागॉन युनिव्हर्सिटी तरुणांना प्रशिक्षण देते आणि सहकारी मूल्यांना प्रोत्साहन देते. ‘लाबोराल कुट्चा’ ही एक सहकारी बँक असून ती को-ऑपरेटिव्हजना वित्तीय सेवा पुरवते. ‘लगुन-आरो’ ही संस्था मोंड्रागॉनच्या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेची व्यवस्था करते. विशेष म्हणजे या सर्व संस्था स्वतःदेखील को-ऑपरेटिव्ह आहेत- अगदी युनिव्हर्सिटीसुद्धा. ही शानदार परिसंस्था (इको-सिस्टिम) एकाएकी तयार झालेली नाही. गेल्या 70 वर्षांत ती हळूहळू उभी करण्यात आली. मोंड्रागॉनची कहाणी 1956 मध्ये सुरू झाली. तेव्हा पाच तरुण अभियंत्यांनी को-ऑपरेटिव्ह तत्त्वावर चूल बनवण्याची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘उल्गोर’ नावाची ही कंपनी यशस्वी ठरली आणि तिने इतर सहकारी संस्थांनाही प्रेरणा दिली. काळानुसार, या को-ऑपरेटिव्हजना कर्ज, वैज्ञानिक संशोधन आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या सहायक सुविधांची गरज भासू लागली. या सुविधा एक-एक करून उभ्या राहिल्या. मोंड्रागॉन को-ऑपरेटिव्हजची एक सामायिक संस्थात्मक रचना आहे. यांची मालकी कर्मचाऱ्यांकडे असते. सर्वसाधारण सभेत (जनरल असेंब्ली) प्रत्येक कर्मचाऱ्याला एक मत असते. सर्वसाधारण सभा एक सुकाणू समिती (संचालन समिती) निवडते. ही समिती व्यवस्थापकांची नियुक्ती करते. व्यवस्थापक हे संचालन समिती आणि सर्वसाधारण सभेला जबाबदार असतात. काही वेळा व्यवस्थापकांची नियुक्ती बाहेरून केली जाते. पण सहसा त्यांना सहकारी संस्थेच्या सदस्यांमधूनच निवडले जाते. मोंड्रागॉनने सुरुवातीपासूनच शिक्षण आणि प्रशिक्षणावर खूप भर दिला आहे. म्हणूनच संस्थेतील व्यवस्थापकांची नियुक्ती करणे शक्य झाले आहे. या को-ऑपरेटिव्हजचे आर्थिक यश खरोखरच उल्लेखनीय आहे. यापैकी काही कंपन्यांची गणना केवळ स्पेनमध्येच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये त्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये केली जाते. कठीण परिस्थितीचा सामना करतानाही या को-ऑपरेटिव्हज खूप मजबूत ठरल्या आहेत. 1970 च्या दशकातील ऊर्जा संकट आणि 2008 चे आर्थिक संकट यांसारख्या गंभीर आर्थिक अडचणींचाही त्यांनी धैर्याने सामना केला. त्याच वेळी स्पेनमधील अनेक कंपन्या बंद पडत होत्या. यात केवळ एक मोठे अपयश आले. 2013 मध्ये मोंड्रागॉन समूहाची सर्वात जुनी सहकारी संस्था दिवाळखोर झाली. मोंड्रागॉन ग्रुपसाठी ही अतिशय दुःखद घटना होती, पण तरीही तो यातून सावरण्यात यशस्वी ठरला. याचा अर्थ असा नाही की आता मोंड्रागॉनमध्ये सर्व काही आलबेल आहे. वाढत्या स्पर्धेच्या दबावामुळे तेथील सहकारी संस्थांना काही तडजोडी कराव्या लागल्या आहेत. उदा : मोंड्रागॉनच्या काही सहकारी संस्थांनी इतर देशांत शाखा उघडल्या आहेत. मात्र, त्या सहकारी संस्था नाहीत.तसेच अनेक सहकारी संस्थांनी तात्पुरते कामगार ठेवण्यास सुरुवात केली आहे, जे त्या सहकारी संस्थांचे सदस्य नसतात. व्यवसायाचा वाढता आकार आणि गुंतागुंतीमुळे सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापकांचा प्रभावही वाढला आहे. इतरही अनेक आव्हाने बाकी आहेत. तरीही, मोंड्रागॉनच्या सहकारी संस्थांनी एक अतिशय महत्त्वाचे काम करून दाखवले आहे. उद्योगांची मालकी मजुरांच्या हातात असू शकते आणि ते कुणा दुसऱ्याच्या नफ्यासाठी नाही, तर मजुरांच्या हितासाठी चालवले जाऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. भांडवलशाहीला कंटाळलेल्या सर्वांसाठी ही शिकवण महत्त्वाची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) या सहकारी संस्थांनी एक महत्त्वाचे काम करून दाखवले आहे. उद्योगांची मालकी मजुरांच्या हातात असू शकते आणि ते कुणा दुसऱ्याच्या फायद्यासाठी नाही, तर मजुरांच्या हितासाठी चालवले जाऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




