ते दिवस आठवा. तेव्हा मूल फक्त एवढेच सांगायचे की, मला हे हवे आहे. मग तुम्ही काहीही करून थोडीबहुत बचत करून, आपल्या पतीपासून काहीतरी लपवून त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग शोधून काढायचात. ते दिवस आठवा. मुलाचे शरीर कढईसारखे तापत असायचे तेव्हा तुम्ही संपूर्ण रात्र जागून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या बदलत राहायचात. आणि तो दिवसही आठवा तेव्हा तुमचा मुलगा अमेरिकेत गेला. त्याने तुम्हाला सांगितले की न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंट बुक करण्यासाठी त्याच्याकडे डाऊन पेमेंटचे पुरेसे पैसे नाहीत. तेव्हा तुम्ही पतीला आपल्यानंतर सर्वकाही त्याच्यासाठीच तर आहे असे सांगून त्यांच्या निवृत्तिवेतनाची बचत काढण्यासाठी तयार केले होते. एके दिवशी काहीतरी बदलते. आता आठवा की कशा प्रकारे तुम्ही वारंवार त्या मोबाइल फोनकडे पाहत राहता. तो कधी मुलाच्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्येसाठी वाजत राहायचा, पण आता शांत आहे. ही शांतता यासाठी नाही की तुमचे मूल आता तुमच्यावर प्रेम करत नाही. पण आता ते मोठे झाले आहे. तो एक प्रौढ व्यक्ती आहे. त्याच्याकडे नोकरी आहे. दूरच्या देशात बैठकांची (मीटिंग्जची) लांबच लांब शृंखला आहे; त्याचे स्वतःचे घर आहे. जोडीदार आहे आणि त्याची स्वतःची मुले आहेत. कारण अनेक माता मुलांच्या आयुष्यातील या टप्प्यांना स्वीकारले पाहिजे हेच विसतात. म्हणूनच त्यांना शांत पडलेल्या फोनच्या ठिकाणी रितेपणा वाटू लागतो. हीच आई कित्येक दशके मुलाला जेवलास का? किंवा काय-काय खाल्ले? असे विचारत होती. ती आता कोणीतरी तिलाही हा प्रश्न विचारण्याची वाट पाहते. वडील कधी आपल्या मुलाची छोटीशी समस्या सोडवण्यासाठी गाडी काढून संपूर्ण शहरात धावपळ करायचे, ते आता माझी पाठ दुखतेय हे सांगण्यासह संकोचतात. माझ्या परिचितांपैकी अनेक पालक आहेत. ते नेहमी भेटतात आणि एकत्र पार्टी करतात. पण त्यांच्यापैकी एखादा म्हणतो माझ्या मुलाने मला फोन केला आणि 45 मिनिटे बोलला तेव्हा त्यांना अचानक गर्दीत एकटे वाटते. आई किंवा वडील बनण्याच्या अनेक दशकांनंतर ते शांतपणे स्वतःला विचारतात की आज कोणाला माझी गरज नाहीये, तर मी कोण आहे? ते भूतकाळातील आठवणींमध्ये निघून जातात. पालकांच्या रूपात त्यांनी आपल्या आयुष्याचा जवळपास अर्धा भाग एका अशा स्पष्ट उद्देशासोबत घालवला होता. त्याला शोधण्याची त्यांना कधी गरजच पडली नव्हती. हा प्रवास मध्यरात्री ऐकू येणाऱ्या एका लहानशा आवाजापासून सुरू झाला होता आणि शाळेचा युनिफॉर्म, लंच-बॉक्स, गृहपाठ, ताप, परीक्षा, कॉलेजमधील प्रवेश, पहिली नोकरी, हार्टब्रेक्स, लग्न आणि मुलांच्या शेकडो लहान-सहान गरजांमधून जात पुढे गेला होता- अशा गरजा कदाचित मुले स्वतःसुद्धा लक्षात ठेवत नसतील. पण आई-वडील त्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या आवडीची प्रत्येक डिश आठवते. त्यांना माहीत असते की त्यांच्यावर कोणते औषध परिणाम करते. त्यांना हेसुद्धा समजते की मूल कधी ठीक असल्याचे नाटक करत आहे. त्यांना मी ठीक आहे. आणि खरोखरच ठीक आहे यातील फरक समजतो. असे यासाठी आहे. कारण ते वर्षानुवर्षे मुलांच्या गरजांना प्रतिसाद देत आले आहेत- मग त्या कितीही लहान असोत किंवा कितीही महागड्या. या सर्व गोष्टी मला तेव्हा आठवल्या. कारण मी या आठवड्यात राशी खन्ना (2013 च्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाची अभिनेत्री) बद्दल वाचले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्या योग्य भूमिका निवडण्याचा प्रयत्न करतात. कारण आज प्रेक्षकांची इच्छा असते की कथेत प्रत्येक पात्राचा एक उद्देश असावा. आणि त्या किती योग्य होत्या. आजच्या एकल माता अचानक आपल्या आयुष्याबद्दलच्या उद्देशाला गमावून बसतात. आणि सर्वात दुःखाची बाब ही की मुले आजसुद्धा आपल्या मातांना मदत करू इच्छितात. पण मातांनाच हे माहीत नाही की मदत मागायची कशी? कदाचित त्यांची घडणच तशी झाली आहे. पालकांकडून ही अपेक्षा करायला हवी की त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. असे काहीतरी शिकावे. ते 30 वर्षांपासून टाळत आले होते. मुलांची वाट न पाहता कुठेतरी फिरायला जावे.
फंडा हा आहे की, प्रत्येक पालकाकडे आयुष्याचा दुसरा उद्देशसुद्धा असायला हवा आणि तो मुलगा दूर जाण्याआधी सुरू होणे यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. आपली मुले नेहमीच आपल्या आयुष्याचा उद्देश बनून राहणार नाहीत. त्यांना त्यांचे स्वतःचे आयुष्यही जगायचे आहे. आपले ध्येयदेखील गाठायचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन























Subscribe to my channel



