रत्नागिरी: शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि फसवणुकीची अंधश्रद्धेला बळी पाडणारी घटना समोर आली आहे. मूल होत नसल्याच्या विवंचनेत असलेल्या एका महिलेला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून, मूल होण्यासाठी विशेष औषध तयार करून देण्याच्या आणि धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तब्बल १ लाख ४४ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हातचलाखी करून पसार झालेल्या दोन अज्ञात महिलांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणी आरटीओ कार्यालयाजवळील मानस रेसिडेन्सी परिसरात वास्तव्य करणाऱ्या सान्वी सुमित आंब्रे (वय ३०) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार १६ जुलै रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी सान्वी आंब्रे यांच्याशी पंजाबी ड्रेस आणि साडी परिधान केलेल्या दोन अज्ञात महिलांनी संपर्क साधला.
या दोन्ही ठग महिलांनी अत्यंत चलाखीने सान्वी आंब्रे यांच्याशी संवाद साधत त्यांना मूल होण्यासाठी एक प्रभावी औषध तयार करून देऊ आणि त्यासाठी एक विशेष धार्मिक विधी करावा लागेल, असे सांगितले. भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसवून या महिलांनी फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला.
हातचलाखीने दागिने लांबवले: विश्वास संपादन केल्यानंतर त्या दोन महिलांनी विधी पूर्ण करण्यासाठी अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून एका कागदामध्ये गुंडाळून साडीत किंवा पिशवीत सुरक्षित ठेवण्यास सांगितले. फिर्यादी महिला त्या प्रक्रियेत व्यस्त असतानाच, संधी साधून दोन्ही भामटा महिलांनी अत्यंत चलाखीने (हातचलाखी करून) दागिने असलेले मूळ पुडके बदलले आणि दुसऱ्या पुडक्यात काहीतरी टाकाऊ वस्तू ठेवून तिथून पोबारा केला.
काही वेळानंतर त्यांनी पुडके उघडून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. या भामटा महिलांनी त्यांच्या जवळील ६९ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ७५ हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स (एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचे दागिने) लांबवल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या दोन संशयित महिलांचा कसून शोध घेतला जात आहे.
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel




