कोल्हापूर: मसाई पठारावर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी चालवलेले स्टंट्स भूभागावर गंभीर पर्यावरणीय परिणाम करत आहेत, ज्यामुळे पर्यावरणप्रेमी चिंतित आहेत. याच्या परिणामी, पन्हाळा वन विभागाने नुकत्याच कारवाईत पाच व्यक्तींवर ११,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संवेदनशील गवताळ परिसंस्थेच्या संरक्षणाची तातडीची गरज या प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडीओंची दखल घेत सूरज प्रकाश पाटील (रा. निवडे, ता. पन्हाळा), सुमित हिंदुराव गुरव, (रा. सोनुर्ले ता. शाहूवाडी), रोहित सुनील जाधव, (रा. कोलोली, ता. पन्हाळा), सूरज मारुती पाटील, (रा. नांदगाव, ता. शाहूवाडी) आणि सिद्धिराज ज्ञानदेव पाटील (रा. निवडे ता. पन्हाळा) या पाच जणांवर कारवाई करत ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम घाटातील महत्त्वाचे गवताळ जैवविविधता क्षेत्र असलेल्या मसाई पठारावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रानफुले, दुर्मीळ वनस्पती आणि सूक्ष्म जीवसृष्टी बहरते. मात्र, ऑफ-रोड ड्रायव्हिंगमुळे नाजूक वनस्पती तुडवल्या जात असून जमिनीचा नैसर्गिक पोत बदलत आहे. त्यामुळे केवळ मसाई पठारावर आढळणाऱ्या लव्हाळवर्गीय, कंदवर्गीय, दुर्मीळ ऑर्किड्स आणि कीटकभक्षी वनस्पतींसह संपूर्ण नैसर्गिक जीवनसाखळी धोक्यात येत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
"संरक्षित वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश किंवा गैरप्रकार करणे हा कायद्याने गुन्हा असून भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक (प्रादेशिक).
गवताळ परिसंस्था अत्यंत संवेदनशील असल्याने वाहनांच्या चाकांमुळे होणारे नुकसान दीर्घकालीन राहते. वन विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, सीसीटीव्ही किंवा ड्रोनद्वारे देखरेख आणि कठोर दंडाची आवश्यकता आहे. मसाई राखीव संवर्धन क्षेत्रासारख्या संवेदनशील परिसरात कायमस्वरूपी वनरक्षकांची नियुक्ती आणि नियमांचे कठोर पालन होणे गरजेचे आहे. प्रा. मकरंद ऐतवडे, वन्यजीव अभ्यासक."
शहर
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
महाराष्ट्र
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मालेगाव: आरोग्य सेवा विस्कळीत; खाजगी डॉक्टरांच्या संपामुळे तिसऱ्या दिवशी १५० हून अधिक शस्त्रक्रिया लांबणीवर.
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
गुन्हा
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
























Subscribe to my channel




