कोल्हापूर: मसाई पठारावर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी चालवलेले स्टंट्स भूभागावर गंभीर पर्यावरणीय परिणाम करत आहेत, ज्यामुळे पर्यावरणप्रेमी चिंतित आहेत. याच्या परिणामी, पन्हाळा वन विभागाने नुकत्याच कारवाईत पाच व्यक्तींवर ११,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संवेदनशील गवताळ परिसंस्थेच्या संरक्षणाची तातडीची गरज या प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडीओंची दखल घेत सूरज प्रकाश पाटील (रा. निवडे, ता. पन्हाळा), सुमित हिंदुराव गुरव, (रा. सोनुर्ले ता. शाहूवाडी), रोहित सुनील जाधव, (रा. कोलोली, ता. पन्हाळा), सूरज मारुती पाटील, (रा. नांदगाव, ता. शाहूवाडी) आणि सिद्धिराज ज्ञानदेव पाटील (रा. निवडे ता. पन्हाळा) या पाच जणांवर कारवाई करत ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम घाटातील महत्त्वाचे गवताळ जैवविविधता क्षेत्र असलेल्या मसाई पठारावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रानफुले, दुर्मीळ वनस्पती आणि सूक्ष्म जीवसृष्टी बहरते. मात्र, ऑफ-रोड ड्रायव्हिंगमुळे नाजूक वनस्पती तुडवल्या जात असून जमिनीचा नैसर्गिक पोत बदलत आहे. त्यामुळे केवळ मसाई पठारावर आढळणाऱ्या लव्हाळवर्गीय, कंदवर्गीय, दुर्मीळ ऑर्किड्स आणि कीटकभक्षी वनस्पतींसह संपूर्ण नैसर्गिक जीवनसाखळी धोक्यात येत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
"संरक्षित वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश किंवा गैरप्रकार करणे हा कायद्याने गुन्हा असून भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक (प्रादेशिक).
गवताळ परिसंस्था अत्यंत संवेदनशील असल्याने वाहनांच्या चाकांमुळे होणारे नुकसान दीर्घकालीन राहते. वन विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, सीसीटीव्ही किंवा ड्रोनद्वारे देखरेख आणि कठोर दंडाची आवश्यकता आहे. मसाई राखीव संवर्धन क्षेत्रासारख्या संवेदनशील परिसरात कायमस्वरूपी वनरक्षकांची नियुक्ती आणि नियमांचे कठोर पालन होणे गरजेचे आहे. प्रा. मकरंद ऐतवडे, वन्यजीव अभ्यासक."
शहर
- पुणे: केंद्र सरकारने नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला; काँग्रेसचा लढा असाच सुरूच राहणार - श्रीनिवास माने!
- मुंबई: दहिसरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्याचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड लांबवली!
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: केंद्र सरकारने नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला; काँग्रेसचा लढा असाच सुरूच राहणार - श्रीनिवास माने!
- मुंबई: दहिसरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्याचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड लांबवली!
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात

























Subscribe to my channel




