ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं ‘रोखठोक’; निवडणूक रणनीतीवर प्रश्नचिन्ह

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर, संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर आपले मत मांडले. ठाकरे बंधूंनी मुंबई, ठाणे आणि नाशिकसारख्या निवडक शहरांवर लक्ष केंद्रित केले, परंतु जर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला असता, तर निवडणुकीचे आकडे नक्कीच वेगळे दिसले असते असे राऊत म्हणाले.

राऊतांच्या या विधानानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नेतृत्वाने घराबाहेर पडून जमिनीवर काम करावे लागते, अशी टीका करत त्यांनी ठाकरे बंधूंच्या पार्टटाईम राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुतीने राज्यभर केलेल्या प्रचाराचा त्यांना निवडणुकीत फायदा झाल्याचे दिसून आले, तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित प्रयत्नांना अपेक्षेनुसार यश मिळाले नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *