पुणे: जमीन खचल्याने मोठा धोका; मढेघाट आणि बालवड-शेनवड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग जाहीर

पुणे: राजगड तालुक्यातील राजगड - केळद रोड (मढेघाट) तसेच माळवडी - जोगवडी - भुतुंडे - बालवड - शेनवड या परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन खचली आहे. यामुळे या भागातील रस्ते पूर्णपणे खराब होऊन खचले असून, नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा संपूर्ण मार्ग पुढील आदेश मिळेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वाचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

रस्ता पूर्णपणे बंद असल्यामुळे केळद पंचक्रोशी भागातील नागरिकांना राजगड (वेल्हे) व पुण्याकडे जाण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवला आहे. त्यानुसार नागरिकांनी केळद - निगडे खुर्द - कुंबळे - चांदवणे - भुतोंडे - पाल बुद्रुक - वाजेघर - खरोव मार्गे राजगड व पुढे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, अतिवृष्टीमुळे माळवडी - जोगवडी - भुतुंडे - बालवड - शेनवड येथे जमीन खचून रस्ता पूर्णपणे तुटल्याने या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर पर्यायी मार्गांकडे वळविण्यात आली आहे. या गावांमधील नागरिकांना राजगड ते पुणे येथे जाण्यासाठी गोहिणी येथील वाहतूक गोहिणी - भुतुंडे - पाल बुद्रुक - वाजेघर - खरीव मार्गाने वेल्हे व पुणे या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल. याशिवाय, बलवड येथील वाहतूक शेनवड - पासली - जाधववाडी - भट्टी या मार्गाने राजगड व पुण्याकडे वळविण्यात आली असून, प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *