टी 20 वर्ल्डकपमध्ये रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे चर्चेत आला आहे. तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो असं बोललं जात आहे. उस्मानच्या कामगिरीवर या सामन्याचा निकाल अवलंबून असू शकतो. मात्र आता उस्मान तारिकसह इतरही असे दोन खेळाडू आहेत जे भारताची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंथा मेंडिसने भारताला या खेळाडूंपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊयात.
भारताला या खेळाडूंपासून सावध राहण्याची गरज
अजंथा मेंडिसने उस्मान तारिकसह अबरार अहमद आणि सैम अयुबपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अजंथा मेंडिसने म्हटले की, कोलंबोतील स्टेडियमवर पाकिस्तानचे सर्वात मोठे शस्त्र अबरार अहमद आणि सैम अयुब ही फिरकी जोडी असू शकते. या ठिकाणी कॅरम बॉल बॅक-स्पिनच्या मदतीने टाकल्यास तो स्किट करतो. त्यामुळे त्यांना प्रेमदासा येथील कोरड्या पिचवर नैसर्गिकरित्या फायदा होऊ शकतो. अबरार आणि सैम अयुब हे असे गोलंदाज आहेत जे बॅक-स्पिनवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना पिचचा फायदा मिळू शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून भारताला सावध रहावे लागणार आहे.
कॅरम बॉल गेमचेंजर ठरणार
पुढे बोलताना मेंडिसने सांगितले की, टी-20 क्रिकेटमध्ये बॅटर बॉलरचा अंदाज घेण्यात वेळ घालवत नाहीत, ते शक्य तितक्या लवकर मोठे शॉट मारतात. त्यामुळे त्यांना बॅक-स्पिनशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. जेव्हा पिच ड्राय असते तेव्हा चेंडू जास्त स्किट करतो. यामुळे बॅटर बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता आणखी वाढते. बॅटर कॅरम बॉल ओळखू शकला नाही तर त्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
अबरार आणि सैम अयुब का धोकादायक?
अजंथा मेंडिसने म्हटले की, अबरार आणि अयुब वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतात. यांचा योग्य वापर केला तर ते खूप प्रभावी ठरू शकतात. कारण दोघांचेही त्यांच्या व्हेरिएशनवर चांगले नियंत्रण आहे. यामुळे फलंदाज गोंधळात पडू शकतो. जर गोलंदाजाने एकाच षटकात सहा कॅरम बॉल टाकले तर फलंदाजाला त्याची सवय होईल. त्यामुळे हा चेंडू सरप्राईज म्हणून वापरला पाहिजे, त्यामुळे याचा गोलंदाजांना चांगला फायदा मिळेल.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


