नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड

नवी दिल्ली: रेल्वेने डिजिटल अनारक्षित (जनरल) तिकिटांबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रवासादरम्यान तिकीट तपासणी होताना केवळ अधिकृत RailOne ॲपवर दिसणारे मूळ डिजिटल तिकीटच वैध मानले जाणार आहे. त्यामुळे WhatsApp वर मिळालेला स्क्रीनशॉट, फोटो, PDF किंवा इतर कोणतीही प्रत ग्राह्य धरली जाणार नाही.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशाने ज्या मोबाईलवरून तिकीट बुक केले आहे, त्याच मोबाईलमध्ये अधिकृत ॲपवर मूळ तिकीट उपलब्ध असणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान स्क्रीनशॉट किंवा फॉरवर्ड केलेले तिकीट दाखवल्यास ते वैध मानले जाणार नाही. अशा परिस्थितीत नियमांनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.

याशिवाय, अनारक्षित डिजिटल तिकीट ट्रेन सुटण्यापूर्वीच खरेदी करणे बंधनकारक आहे. ट्रेन स्टेशन सोडल्यानंतर घेतलेले तिकीट वैध ठरणार नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 

अलीकडेच एका प्रवाशाला WhatsApp वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट दाखवल्यामुळे दंड भरावा लागल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वेने हा नियम पुन्हा स्पष्ट केला आहे.

प्रवाशांनी काय लक्षात ठेवावे?

• तिकीट नेहमी अधिकृत RailOne ॲपवरूनच दाखवा.
• WhatsApp स्क्रीनशॉट, PDF किंवा फोटोवर अवलंबून राहू नका.
• ट्रेन सुटण्यापूर्वीच डिजिटल तिकीट बुक करा.
• तिकीट बुक केलेला मूळ मोबाईल सोबत ठेवा.

प्रवासादरम्यान कोणताही त्रास किंवा दंड टाळण्यासाठी रेल्वेच्या या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *