सोलापूर: सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका परिसरातील कचरा डेपोजवळ एका भीषण अपघातात रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात घडला. धावत्या रिक्षासमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा जीवघेणा अपघात झाला.
नेमकी घटना काय?
जुना तुळजापूर नाका परिसरातील पसारे वस्ती येथे राहणारे नितीन नारायण माने (वय ३७) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी सायंकाळी ते आपली रिक्षा घेऊन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. ते कचरा डेपो परिसरापर्यंत पोहोचले असताना, अचानक रस्त्यावर एक भटका कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नितीन यांनी रिक्षाचा जोरात ब्रेक लावला, ज्यामुळे त्यांचे रिक्षालवरील नियंत्रण सुटले.
दुभाजकाला धडकून रिक्षा उलटली:
नियंत्रण सुटलेली रिक्षा थेट रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन धडकली आणि पलटी झाली. या अपघातात नितीन माने यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नागरिकांमध्ये संताप:
नितीन माने यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, यामुळे वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




