नागपूर: Google वर डॉक्टरांचा नंबर शोधण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा; सायबर तज्ज्ञांचा मोठा इशारा !

नागपूर: इंटरनेटवर डॉक्टरांचा मोबाईल नंबर किंवा हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक शोधणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी आता Google Search चा वापर करून लोकांची फसवणूक करण्याची नवी पद्धत अवलंबल्याचे समोर आले आहे. बनावट डॉक्टरांचे संपर्क क्रमांक, क्लिनिकची खोटी माहिती किंवा फसवे हेल्पलाइन नंबर इंटरनेटवर अपलोड करून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे.

सायबर गुन्हेगारांकडून बनावट क्रमांकावर कॉल करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानंतर अपॉइंटमेंट बुकिंग, नोंदणी शुल्क किंवा आगाऊ रक्कम भरण्याच्या नावाखाली पीडितांकडून पैसे उकळले जातात. काही प्रकरणांमध्ये लिंक पाठवून मोबाईल किंवा बँकिंगची गोपनीय माहिती चोरली जाते, ज्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, डॉक्टर किंवा रुग्णालयाचा नंबर शोधताना नेहमी अधिकृत वेबसाइट, अधिकृत सोशल मीडिया पेज किंवा विश्वासार्ह स्रोतांचा वापर करावा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *