मुंबई:राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पालाही बसला आहे. खोपोली–कुसगाव दरम्यान असलेल्या मिसिंग लिंकवरील टनेल क्रमांक २ च्या बाहेर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एक लेन वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आली असून दुसरी लेन तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरड हटविण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले असून त्यामुळे लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक वाहनचालकांना काही तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गालाही फटका बसला आहे. कर्जत–लोणावळा घाट विभागात दरड कोसळल्याने काही रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना प्रवासापूर्वी वाहतुकीची सद्यस्थिती तपासण्याचे, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि घाटमाथा परिसरात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने पुढील काही तास परिस्थिती बदलू शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहर
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
- नाशिक: येवल्यात शिवसेनेचे ७ नगरसेवक महायुतीच्या गोटात; समीर भुजबळांच्या उपस्थितीत नवे समीकरण
- मुंबई: गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक २४ तासांपासून ठप्प!
महाराष्ट्र
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
- नाशिक: येवल्यात शिवसेनेचे ७ नगरसेवक महायुतीच्या गोटात; समीर भुजबळांच्या उपस्थितीत नवे समीकरण
- मुंबई: गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक २४ तासांपासून ठप्प!
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



