"माझं हृदय भरून आलंय...!" टीम इंडियाकडून पदार्पणानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची भावनिक पोस्ट व्हायरल; मोडला सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांचा ऐतिहासिक विक्रम!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेटला एक नवा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवस वयाचा बिहारचा 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने भारतीय वरिष्ठ संघातून अधिकृत आंतरराष्ट्रीय पदार्पण (International Debut) केले आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवताच वैभवने क्रिकेटचे दैवत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक सामन्यानंतर वैभवने सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावूक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांचा विक्रम इतिहासजमा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध वयाच्या १६ वर्षे २०५ दिवस असताना पदार्पण केले होते. गेल्या ३७ वर्षांपासून हा भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम अबाधित होता. मात्र, काल वैभवने मैदानात पाऊल टाकताच हा विक्रम मोडीत काढून इतिहास रचला. त्याला भारताची मानाची 'डेब्यू कॅप' उपकर्णधार तिलक वर्माने थमावली. वयाच्या १२ व्या वर्षी रणजी, १४ व्या वर्षी आयपीएल (राजस्थान रॉयल्स) आणि आता १५ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

"तुमच्या प्रेमाने माझं हृदय भरून आलंय!" – वैभवची भावूक पोस्ट

सामन्यानंतर वैभवने इन्स्टाग्रामवर चाहत्यांचे आभार मानणारा एक अत्यंत भावनिक संदेश लिहिला, ज्याने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

"तुमचे सर्व संदेश आणि शुभेच्छा पाहून खरोखरच माझं हृदय भरून आलं आहे. मला नेहमी पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या सर्व सिनियर्स, हितचिंतक आणि चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे मी माझे मोठे भाग्य समजतो. आपल्या टीम इंडियासाठी मैदानवर नेहमी माझं सर्वोत्तम देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!" असे वैभवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पदार्पणाच्या सामन्यात दाखवले तेवर; जोफ्रा आर्चरला ठोकला षटकार

पदार्पणाच्या सामन्यात वैभवने १० चेंडूत १४ धावा केल्या. मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याने जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर उत्कृष्ट षटकार खेचत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या निडर फलंदाजीची झलक दाखवून दिली. फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षण करतानाही त्याने सॅम करनचा एक अप्रतिम आणि कठीण झेल (Sharp Catch) टिपून सर्वांना थक्क केले. फिरकीपटू विल जॅक्सच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो जोस बटलरकरवी यष्टिचित (Stumped) झाला. मात्र, त्याच्या या खेळीने आणि मैदानातील आत्मविश्वासाने त्याने भारतीय क्रिकेटचे भविष्य किती उज्ज्वल आहे, हे दाखवून दिले आहे.



हे पण वाचा-
अभियांत्रिकी प्रवेश २०२६ चा बिगुल वाजला! जूनमध्येच नोंदणी सुरू, राज्यातील ३०० हून अधिक कॉलेजांचा पर्याय; प्रवेशाच्या '४' फेऱ्या अन् 'या' कागदपत्रांची पडणार गरज!अभियांत्रिकी प्रवेश २०२६ चा बिगुल वाजला! जूनमध्येच नोंदणी सुरू, राज्यातील ३०० हून अधिक कॉलेजांचा पर्याय; प्रवेशाच्या '४' फेऱ्या अन् 'या' कागदपत्रांची पडणार गरज!

शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *