पुणे: अत्यंत गाजलेल्या आणि धक्कादायक अशा लोहगड किल्ला हत्याप्रकरणात (Ketan Agrawal Murder Case) आता एक नाट्यमय कायदेशीर वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी, सियाचा भाऊ साहिल गोयल याच्यावर थेट १० कोटी रुपयांच्या मानहानीची (Defamation) कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एक अनपेक्षित प्रसंग घडला. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी सुरू होताच अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी न्यायालयात सिया गोयल हिचे वकील म्हणून बाजू मांडण्यास सुरुवात केली. मात्र, याच वेळी न्यायालयात सिया गोयल हिने एक धक्कादायक खुलासा केला. तिने न्यायाधीशांना सांगितले की, "अॅड. आशुतोष श्रीवास्तव हे माझे अधिकृत वकील नसून, माझे वकील अॅड. विपुल दुशिंग आहेत."
आपल्याच कथित अशीलने भर न्यायालयात केलेला हा खुलासा ऐकून अॅड. श्रीवास्तव संतापले आणि त्यांनी तातडीने न्यायालयाबाहेर पडणे पसंत केले. या प्रकरणानंतर साहिल गोयलने अॅड. श्रीवास्तव यांच्यावर काही गंभीर आणि बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.
१० कोटींची कायदेशीर नोटीस:
साहिल गोयलने आपल्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे, द्वेषमूलक असून त्यामुळे आपली व्यावसायिक प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिमेला गंभीर धक्का लागला असल्याचे अॅड. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. या मानहानीबद्दल त्यांनी साहिल गोयलकडे १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच, ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागावी आणि भविष्यात अशी बदनामीकारक विधाने करणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे, अशी कठोर अटही या नोटीसद्वारे घातली आहे.
तपासाची सद्यस्थिती:
दरम्यान, १८ जून रोजी केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या केल्याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक, डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करत आहेत. या गुन्ह्यात सियाच्या कुटुंबीयांचा काही सहभाग आहे का, याचाही शोध यंत्रणांकडून घेतला जात आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




