
PM Modi Sabha : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेसाठी पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत. या सभेत सहभागी नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली आहे. यावेळी शहरात मोदींच्या सभेला भाजपने सुमारे ६० हजार नागरिक जमण्याचा अंदाज वर्तवला आहे.
|
Pune News : पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत आयटी इंजिनीअरची फसवणूक, १९ लाखांचा गंडा |
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसंच सभास्थानी मोबाईल व्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. जिल्ह्यांतून पोलिसांच्या पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असणार आहेत.
पुण्यात स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात तगडा बंदोबस्त करण्यात येत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका आहेत.
महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी (Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (Lok Sabha Election) देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




