एक विचार असा आहे, जे होत आहे ते होऊ द्या. जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करु नका. प्रकृतीची लीला, नियतीची इच्छा समजून त्या कडे त्रयस्थ, तठस्थ भावनेने पहा. हाच सुखाचा मार्ग असू शकतो. चांगले किंवा वाईट काहीच नाही. होत आहे ते होऊ देणे. येथे हरवून जावे असे तुमचे काय आहे? सर्व प्रकृतीचे आहे, निसर्गाचे आहे. आपला काहीच अधिकार नाही. म्हणून प्रत्येक घटनेचे फक्त साक्षी व्हा. सुख-दुःखाच्या पलीकडे जाण्याचा हाच मार्ग आहे. प्रत्येक जीव हा त्याचा स्वतःचा असतो. कारण चैतन्य स्वतंत्र असते. ते इतर कोणाच्याही मालकीचे नसते. तसेच प्रत्येक अजीव म्हणजेच भौतिक पदार्थ हा त्याचा स्वतःचा असतो. जीव आणि अजीव ह्या दोन स्वतंत्र राशी विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, याशिवाय तिसरा पदार्थ नाही. आणि मुख्य म्हणजे हे दोन्हीही स्वतः स्वतंत्र अस्तित्वात आहेत. जीव अजीवाचा कधीही होऊ शकत नाही आणि अजीव हा कधीही जीवाचा होऊ शकत नाही हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण जे पंचमहाभूत म्हणतो तेच अजीव किंवा भौतिक पदार्थाचे सर्व प्रकार. परंतु एक सत्य आहे की जीव हा अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. जीवामध्ये चैतन्य असते म्हणून अनेक प्रवृत्ती असतात. अजीवामध्ये चैतन्याचा अभाव असल्यामुळे प्रवृत्ती नसतात. मात्र अजीवाचे काही मूलगुण असतात. जसे स्पर्श, वर्ण, गंध, रस अर्थात गरम किंवा थंड असणे, कोणता तरी रंग असणे, त्याला चव असणे, नियमित किंवा अनियमित आकार असणे आणि खंडित होणे किंवा एकत्र जुळणे. हे सर्व अजीव पदार्थाच्या मूळ लहानात लहान सूक्ष्म कणाचे गुणधर्म असतात. हे सर्व एकत्र होऊन मोठा पदार्थ होतो. चैतन्य आत्मा जेव्हा संसारात असतो, तेव्हा कर्मजनीत अवस्थेमुळे त्याच्या काही प्रवृत्ती असतात. संसारात असलेल्या जीवाला जीवन जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता पडते. म्हणजेच तो अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. हा जीव आणि अजीव यांच्यातील परस्पर सह-अस्तित्वाचा सिद्धांत आहे. इतके माहीत असल्यानंतरही मनुष्य भौतिक वस्तूंचा लोभ, मोह, संग्रह करतो. भौतिक पदार्थांच्या,वस्तूंच्या प्राप्तीसाठी जीवनातील महत्त्वाचा सर्व वेळ खर्च करतो. त्याचे कारण हेच की तो भौतिकते मध्ये सुख शोधत असतो. परंतु खूप मेहनत, कष्ट आटापिटा केल्यानंतरही ज्यावेळेस तो भौतिकतेच्या मागे थकून भागून अखेर स्थिरावतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरे सुख हे वस्तूंच्या मागे भौतिकतेच्या मागे पर-पदार्थाच्या मागे धावण्यात, पळण्यात, त्यांना मिळवण्यात नसून ते आपल्या अंतरात आहे. सुख हे समाधानात आहे. आपल्या मानण्यात आहे. समभावात जगण्यात आहे. म्हणजेच खरे सुख हे अंतरातील संतोष वृत्ती मध्ये आहे. म्हणून असे म्हणावे वाटते की निसर्ग आणि नियतीच्या इच्छेनुसार जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्यात फार बाधा उत्पन्न करण्याचे कारण नाही. अविचल आणि संतुलित, संतोष आणि समाधानी, अर्थात समभावाने जीवन जगण्यातच खरे सुख, समाधान आहे हे जाणून घ्यावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



