मुंबई विमानतळ म्हणजे मिनिटा-मिनिटांना होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे आणि सतत प्रवाशांची तपासणी आदी सोपस्कार पार पाडून प्रवाशांची विमाने पकडण्याची घाई..परंतू मात्र १० फेब्रुवारीच्या सकाळ काही वेगळीच होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) येथील आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गिकेत एक विलक्षण वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग घडला. एका परदेशी महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. अखेर कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने त्वरित हालचाली केल्याने या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतू हा जन्म कसा झाला आणि डॉक्टरांनी काय शर्थ लढवली हे वाचा….
सकाळी ५:१७ वाजता अचानक लगबग वाढली. विमानतळाच्या वैद्यकीय पथकाला एका प्रवासी महिलेला तातडीची वैद्यकीय मदतीची गरज असल्याचा कॉल आला. ही २६ वर्षीय महिला प्रवासी ( टांझानियाची नागरिक ) महिला साधारणपणे ३६ आठवड्यांची गर्भवती होती. आणि आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय असा प्रवास करत असताना तिला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या त्यामुळे कर्मचाऱ्यांची कसोटी लागली.
डॉक्टरांची शर्यत
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून CSMIA च्या वैद्यकीय पथकाने अतिशय वेगाने हालचाली केल्या. काही मिनिटांतच डॉक्टर घटनास्थळी पोहोचले. या प्रवासी महिलेला तीव्र प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. गर्भजल पिशवी फुटल्याने आणि तीव्र प्रसूती कळा त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रसुती होऊ शकते हे डॉक्टरांनी पाहिले आणि निर्णय घेतले गेले.
गर्भवती महिलेला काळजीपूर्वक विमानतळाच्या रुग्णवाहिका बग्गीतून स्ट्रेचरवर हलविले आणि टर्मिनलमधील लिफ्टद्वारे एअरसाईड रुग्णवाहिकेकडे नेण्यात आले. या प्रक्रियेत विमानकंपनीचे कर्मचारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांनी मोलाचे सहकार्य केले. टर्मिनल कार्यकारी पथकाने स्थलांतर अधिकाऱ्यांशी तातडीने समन्वय साधत तात्पुरता प्रवासी व्हिसा त्वरित जारी होईल, याची खात्री केली. ज्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी सर्व यंत्रणांना झटपट निर्णय घेतल्याने कोणताही प्रशासकीय विलंब झाला नाही.
पहाटे ५:४० वाजता, विमानतळाचे वैद्यकीय पथक आणि एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका हॉस्पिटलकडे रवाना झाली. पण, प्रवासाला सुरुवात होऊन काही काळ उलटला नसेल, तोच परिस्थिती अधिक आव्हानात्मक झाली. रुग्णवाहिका पहाटे शहरातील वाहतुकीतून मार्ग काढत असताना त्या महिलेच्या प्रत्यक्ष प्रसूतीला सुरूवात झाली. कोणतेही ऑपरेशन थिएटर नाही की कोणतीही अन्य व्यवस्था आणि डॉक्टरांनी रूग्णवाहिकेत प्रसुती केली.
धावत्या रूग्णवाहिकेमध्ये प्रसूती
धावत्या रुग्णवाहिकेमध्येच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने अत्यंत तत्परतेने आणि निर्णायकपणे पावले उचलली. प्रसूतीची प्रक्रिया सुरु करीत डॉक्टरांनी त्या महिलेला योग्य स्थितीत राहण्यास मदत केली. काही क्षणांनंतर, बाळाचे डोके दिसू लागले आणि पहाटे ५:४५ वाजता रुग्णवाहिकेत या महिलेने बाळास जन्म दिला. मुंबई शहर साखर झोपेतून जागे होत असताना बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मातेच्या आणि एम्ब्युलन्समधील डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
वैद्यकीय पथकात डॉ. कृतिका, डॉ. मधु आणि डॉ. किसले यांचा समावेश होता. त्यांना परिचारका माधुरी आणि अशोक तसेच रुग्णवाहिका चालक ओंकार यांचे सहकार्य लाभले. माता आणि बाळ दोघांनाही पहाटे ५:५५ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेले, माता आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने कळवले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
एमआयएएलसाठी असे प्रसंग क्वचितच घडतात, भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळाची जबाबदारी अदाणी विमानतळ होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल)ची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कडे आहे. या एमआयएएलच्या वैद्यकीय आणि कार्यकारी पथकांच्या जलद प्रतिसादामुळे घरापासून दूर आणि प्रवासादरम्यान असलेल्या एका महिलेने गोंडस मुलीला सुखरूप जन्म दिला…
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




