संदीप देशपांडे, भगतसिंग कोश्यारीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Sandip Deshpande on Bhagatsingh Koshyari: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी काल माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरतात असा दावा कोश्यारी यांनी केला होता. त्यावरुन राजकारण ढवळून निघाले. मनसे गोटातून यावर प्रतिक्रिया अपेक्षित होती. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्यांनी कोश्यारींना चांगलेच सुनावले.
तर चांगला चोपला असता
आज जर भगतसिंग असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कोश्यारी यांनी पहिलं नाव बदलावं असा सल्लाही त्यांनी दिला. कालच्या कोश्यारींच्या वक्तव्यावरून मनसे नेते भडकल्याचे दिसून आले. कोश्यारींनी नाशिकमध्ये बोलता बोलता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटीवरून निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कोश्यारींनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यावर आज मनसे स्टाईलने प्रतिक्रिया देण्यात आल्याचे दिसून आले.
रोड खोदण्याची परवानगी कुणी दिली?
मुंबईत सिमेंटचे रोड सुरु झाले आहेत त्याची काम सुरु आहेत. हे रोड बनवून झाल्यावर ते पून्हा खोदायची काम सुरू झाली आहेत. याला कोणी परवानगी दिली आहे. रोड बनवल्यावर रोड खोदण्याची गरज काय पडली? रोड खोदल्यावर मुंबई शहरात बेस्टची केबल असताना टाटा पॉवरला परवानगी का देण्यात आली? टाटा पॉवरला परवानगी देताना म्हटले आहे कि 220k केबल टाकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या इलेक्ट्रिक केबल नाहीत त्या ऑप्टिकल फायबर केबल का टाकण्यात येत आहेत. टाटा पॉवरला परवानगी दिलीय तर चार प्रकारच्या केबल का टाकल्या जातायत? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
अधिकाऱ्यांची चौकशी करा
काल आम्ही या संदर्भात अधिकार्यांची बैठक केली. त्या अधिकार्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवली आहे. याच्या अगोदर राज ठाकरे आणि आम्ही पालिकेत गगराणी यांना भेटलो होतो. जेव्हा केबल टाकण्यासाठी खोदकाम केलं जात तेव्हा फक्त खड्डे भरण्याचे पैसे त्यांना दिले जातात पालिकेला अधिक पैसा का दिले जात नाहीत? कोणते अधिकारी आहेत ज्यांनी अधिकार्याच्या बाहेर जाऊन काम केले जात आहेत. या अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे. लोकांना त्रास होतो पालिकेला काही मिळत नाही. पालिकेला ठणठण गोपाळ मिळतंय अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.
आतापर्यंत प्रशासन होत त्या काळात सर्व सुरु होत आता नगरसेवक आवाज उठवतील असं वाटतय पण आमचे नगरसेवक देखील आवाज उठवतील. त्यांना इलेक्ट्रिक केबल बसवण्याची परवानगी देण्यात आली असेल तर तेवढच त्यांनी कराव त्यांनी त्याऐवजी ऑप्टिकल फायबरची परवानगी दिली असताना त्यांनी जर बॉम्ब ठेवला तर कस चालेल यावर अंकुश ठेवला पाहिजे, असे देशपांडे म्हणाले.
उबाठाच्या नगरसेवकांना एक एक कोटी
मला मिळालेली माहिती आहे कि उबाठाचे नगरसेवक आहेत त्यांना एक एक कोटी देण्यात आले आहेत. यावरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. संजय राऊत यांना अंधारात ठेवलं कि त्यांनी स्वत:हून डोळ्यावर पट्टी बांधली हे पाहावं. संजय राऊत यांच असं झालंय कि हम करे तो रासलीला आणि तुम करे तो कॅरेक्टर ढिला असं कसं चालेल, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

