मी जितका जास्त रुग्णालयांमध्ये जातो तितकाच माझा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा मी रुग्ण आणि परिचारिका यांच्यातील संवाद पाहतो तेव्हा मला त्यात एक वेगळेच कौशल्य दिसते. त्यांच्यात एकमेकांची देहबोली समजून घेण्याची क्षमता असते. न बोललेल्या गोष्टींचा अर्थ सहज समजून घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. हे पाहून माझा विश्वास अधिक दृढ होतो की हे गुण पूर्णपणे मानवी आहेत. किमान सध्या तरी मशीन्स या गुणांच्या आसपासही पोहोचू शकत नाहीत. एआयच्या वाढत्या वापरामुळे मशीन्स आपली जागा घेतील, अशी भीती वाटणाऱ्या सर्वांसाठी हा लेख आहे. ‘जॉब्स फॉर द फ्यूचर’च्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया फ्लिन एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. त्यांच्या मते, विविध उद्योग आणि व्यवसायांमध्ये अशी काही कौशल्ये आहेत, जी एआय कधीच बदलू शकत नाही. ही कौशल्ये पूर्णपणे मानवी आहेत. हे अगदी खरे आहे. आज आयटी सपोर्टसारख्या तांत्रिक कामांच्या जागा निघतात तेव्हा अनेक कंपन्या चांगल्या संवाद कौशल्याची मागणी करतात. येथे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अशी 5 कौशल्ये दिली आहेत, जी केवळ नोकरी मिळवण्यासाठीच नाही, तर करिअरच्या प्रगतीसाठीही आवश्यक आहेत. या क्षेत्रांमध्ये आजही माणूस एआयपेक्षा खूप पुढे आहे, असे तज्ज्ञ मानतात. पहिले कौशल्य म्हणजे सहानुभूती होय. परिचारिकेचा व्यवसाय याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. रुग्णालयांमध्ये कागदपत्रांचे काम करण्यासाठी एआय उपयुक्त ठरू शकतो. यामुळे परिचारिकांना रुग्णांची अधिक सहानुभूतीने सेवा करण्यासाठी वेळ मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला माझी पत्नी रुग्णालयात दाखल होती तेव्हा तिथल्या परिचारिका आमच्यासाठी वरदान ठरल्या. त्यांनी जे केले ते कोणताही रोबोट कधीच करू शकत नाही. त्यांनी दिलेला धीर म्हणजे मशीनने केलेली विचारपूस नव्हती, तर तो एक खराखुरा मानवी जिव्हाळा होता. त्या सेवेमध्ये संवाद, विज्ञान आणि रुग्णाच्या प्रकृतीची अचूक समज एकत्र गुंफलेली होती. परिचारिकेमध्ये रुग्णाच्या भावना समजून घेण्याचे आणि त्याच्याशी जोडले जाण्याचे मानवी गुण असतात. आजारातून लवकर बरे होण्यासाठी हीच काळजी सर्वात महत्त्वाची असते. दुसरे कौशल्य म्हणजे संबंध निर्माण करणे. अलीकडेच मी एका रिअल इस्टेट कार्यालयात गेलो होतो. तिथे ग्राहकांकडून पैसे गोळा करणारे कर्मचारी सर्वात जास्त तणावाखाली होते. परंतु, त्यांच्यातील काही जण आपले काम खूप चांगल्या प्रकारे करत होते. त्यांनी फाइल्स आणि डेटाबेस तयार करण्याचे काम एआयवर सोपवले होते. ते स्वतः मात्र ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक संबंध जोडण्यावर लक्ष केंद्रित करत होते. जेव्हा पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले तेव्हा हेच परस्पर कौशल्य कामाला आले. लोकांच्या अपेक्षा सांभाळणे, त्यांची नाराजी दूर करणे आणि नाते निर्माण करणे यासाठी माणसाचीच गरज असते. एआय असा विचार करू शकत नाही. तिसरे कौशल्य म्हणजे सखोल विचारक्षमता अर्थात क्रिटिकल थिंकिंग. एआय मॉडेल्स माहिती गोळा करून उत्तरे तयार करू शकतात, पण ते स्वतःच्या चुका शोधू शकत नाहीत. एआयने दिलेल्या उत्तराचा योग्य अर्थ लावण्यासाठी माणसाकडे समज, सखोल विचार करण्याची क्षमता आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एआय चॅटबॉट्समध्ये नेहमी युझर्सची मनधरणी करण्याची आणि त्यांच्या भावनांचे समर्थन करण्याची प्रवृत्ती असते. माणसाच्या तुलनेत ते युझरच्या कृतींचे 49% जास्त समर्थन करतात. नेमक्या याच ठिकाणी माणसाला थोडे थांबून गंभीरपणे विचार करावा लागतो. चौथे कौशल्य म्हणजे सद््सद्््विवेकबुद्धी होय. काय योग्य आणि काय अयोग्य यातील फरक ओळखणे किंवा अंतरात्म्याचा आवाज ऐकणे हे केवळ मानवी कौशल्य आहे. आपण आपल्या भावना आतून अनुभवतो हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत नैतिक ठरेल असे एआय मॉडेल तयार करणे अत्यंत कठीण आहे. पाचवे कौशल्य म्हणजे निर्णय घेणे. रणनीती तयार करताना किंवा ब्रँडची ओळख निर्माण करताना एआय अपयशी ठरतो. अस्पष्ट परिस्थितीमध्ये निर्णय घेणे आणि कल्पक कल्पना देणे एआयला सहज जमत नाही. माणूस आपल्या संपूर्ण ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या जोरावर निर्णय घेतो. याउलट एआय केवळ डेटाच्या आधारे निर्णय घेतो. ही पद्धत गुंतागुंतीच्या किंवा अस्पष्ट परिस्थितीत अजिबात काम करत नाही. फंडा असा की... आर्थिक बदल, तांत्रिक स्थित्यंतरे आणि बाजारातील चढ-उतार या काळात कोणतेही साधन किंवा तंत्रज्ञान वापरले जात असले तरी ‘ड्युरेबल स्किल्स’ म्हणजेच टिकाऊ कौशल्ये हीच अशी गोष्ट आहे, जी कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी खरोखर मूल्यवान बनवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



