Is Your Phone Showing 'No Service'? Beware of SIM Swap Fraud – Here’s How to Detect and Protect Yourself

मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!

Is Your Phone Showing 'No Service'? Beware of SIM Swap Fraud – Here’s How to Detect and Protect Yourselfडिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यापैकीच एक गंभीर प्रकार म्हणजे 'सिम स्वॅप फ्रॉड' (SIM Swap Fraud). अनेकदा आपल्याला मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याची समस्या जाणवते, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, ही एक धोक्याची घंटा असू शकते.

 

सिम स्वॅप फ्रॉड म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे?

नेमकी समस्या काय?:  तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये असताना अचानक तुमच्या मोबाईलचे नेटवर्क पूर्णपणे गायब होते. स्क्रीनवर 'No Service' किंवा 'Emergency Calls Only' असा मेसेज दिसू लागतो. आपण सामान्यतः फोन रिस्टार्ट करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो.

धोक्याची खूण: जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या फोनमध्ये नेटवर्क व्यवस्थित येत असेल आणि फक्त तुमच्याच फोनचे नेटवर्क गायब झाले असेल, तर सावध व्हा. तुमचे सिम कार्ड अनधिकृतपणे हॅकर्सनी दुसऱ्या डिव्हाइसवर ट्रान्सफर (SIM Swap) केलेले असू शकते.

हॅकर्स काय करतात?: हॅकर्स तुमच्या सिम कार्डचा क्लोन किंवा स्वॅप करून तुमचे बँक खाते, सोशल मीडिया आणि इतर वैयक्तिक माहितीच्या ॲक्सेस मिळवतात. यामुळे तुमचे बँक खाते रिक्त होण्याचा मोठा धोका असतो.

काय काळजी घ्याल?: जर तुमच्या फोनचे नेटवर्क बराच वेळ येत नसेल, तर त्वरित तुमच्या टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला किंवा जवळच्या केंद्राला संपर्क साधा.

तुमच्या फोनवर अचानक कॉल येणे किंवा मेसेज येणे बंद झाल्यास तातडीने सायबर सेलकडे तक्रार करा.

तुमच्या वैयक्तिक माहितीची कोणाशीही देवाणघेवाण करू नका.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये  https://punenews24.in/



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *