मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा पुनर्विकास आता जागतिक दर्जाच्या 'सिंगापूर आणि हाँगकाँग' मॉडेलवर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला गती देत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पात आधुनिक गृहनिर्माण संकुले, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक सुविधांचा समावेश असेल.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. धारावीची औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवूनच विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
प्रकल्पाचे प्रमुख मुद्दे:
पहिला टप्पा: २०२८ पर्यंत किमान १० हजार घरे नागरिकांना हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटी: धारावीत 'मल्टीमोडाल ट्रान्सपोर्ट कॉरिडोर' विकसित केला जाईल. यामध्ये मेट्रो मार्गिकांसह पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांना जोडणारे एक हब तयार होईल. भविष्यात हे स्थानक 'बुलेट ट्रेन'शी जोडण्याचीही योजना आहे.
विमानतळ सुविधा: मुंबई विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी धारावीतच 'सिटी चेक-इन' सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, जलमार्गाने विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जेट्टी आणि भविष्यात 'एअर टॅक्सी' सेवा सुरू करण्याचेही नियोजन आहे.
व्यावसायिक विकास: कुंभारवाडा यांसारख्या प्रसिद्ध परिसराची वेगळी ओळख जपत, तेथील रोजगाराचे संरक्षण करून विकास केला जाईल. बस आगाराच्या जागेवर रहिवासी आणि व्यावसायिक संकुले उभारली जातील.
कालावधी: पुनर्वसन इमारतींचे काम ४२ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तर संपूर्ण प्रकल्प पुढील १० वर्षांत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या बैठकीत वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि धारावी परिसरात 'ग्रीन झोन' तयार करण्यावरही भर देण्यात आला असून, पादचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील.
शहर
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
महाराष्ट्र
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
- कोल्हापूर: ‘गोकुळ’ निवडणुकीवरून राजकारण तापले! महायुतीला चिन्ह मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव, आमदार सतेज पाटील यांचा जोरदार घणाघात!
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



