बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपण इंटरनेटवरील द्वेषाला‎ का म्हणून स्वीकारले ?‎

अलीकडे टॉक्सिक फॅन-कल्चर पुन्हा एकदा भीषण‎स्वरूपात समोर आले. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेड‎आणि विराट कोहली यांच्या हस्तांदोलनावरून निर्माण‎झालेला वाद हेडच्या पत्नी आणि कुटुंबापर्यंत पोहोचला.‎पुन्हा एकदा आपण मर्यादा तोडलेल्या पाहिल्या. मात्र, हे‎पहिल्यांदाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी अशा घटना‎घडतात. तेव्हा हे ट्रोल्स चाहतावर्गाच्या भावनेला कलंक‎लावताना आणि घृणास्पद कृत्य करताना दिसतात.‎कोणालाही कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा हक्क‎नाही. या विषयावर शून्य सहनशीलतेची भूमिका‎आवश्यक आहे. मी स्वतः ही परिस्थिती अनुभवली आहे‎ आणि आई, पत्नी किंवा मुलांना अपमानास्पद नावांनी‎हाक मारली जाणे किती वेदनादायक असते, हे मला‎माहीत आहे. हाच तो टप्पा आहे. येथे सोशल मीडिया‎गलित स्थितीत जातो. त्यावर तातडीने नियंत्रण‎आणण्याची गरज आहे.‎ ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवरील‎टॉक्सिक चाहत्यांच्या या फौजेलाही हे समजून घ्यावे‎लागेल की, एखाद्या व्यक्तीविषयी आंधळी निष्ठा‎दाखवून ते मोठ्या उद्देशालाच हानी पोहोचवत आहेत. ‎‎ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी करून ते ‎‎विराट कोहलीविषयी निष्ठा सिद्ध करत नाहीत. प्रत्यक्षात‎व्यक्ती-केंद्रित फॅन-संस्कृती दिवसेंदिवस अधिक क्रूर‎आणि विषारी बनत आहे. व्यक्तिपूजा ही भारतीय‎क्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक राहिली‎आहे. अनेकदा असे वाटते की, आपल्या आवडत्या‎खेळाडूने धावा केल्या की चाहते समाधानी होतात, मग‎संघ हरला तरी चालते. त्याच धर्तीवर मग असा विचार‎होतो की, आपल्या आवडत्या खेळाडूसोबत वाद‎घालण्याची हिंमत कुणी केलीच कशी? मग त्याच्या‎कुटुंबालाही यात ओढले जाते. तेंडुलकर आणि द्रविड‎युग कोहली आणि रोहितपूर्वी होते. त्यांच्याही आधी‎गावस्कर आणि कपिल यांचा काळ होता. पण विराट‎आणि रोहित समर्थकांमधील टॉक्सिक फॅन-वॉर दिसते‎तसे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. आणि यात‎सर्वात मोठे नुकसान भारतीय क्रिकेटचेच होत आहे. या‎घटनेनंतर ट्रॅव्हिस हेडच्या समर्थनाचा दावा करणारी‎बनावट खातीही समोर आली. त्यांचा वापर कोहली‎आणि त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करण्यासाठी‎करण्यात आला. हेही तितकेच निषेधार्ह आहे. यात शंका‎नाही की, भारतीय ‘चाहत्यां’चाच एक गट यामागे आहे.‎त्यांच्यासाठी हा फक्त स्वतःचा द्वेष आणि कोहलीविरोध‎व्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग आहे. परिणामी,‎वेगवेगळे चाहतागट एकमेकांशी भांडताना दिसत आहेत‎आणि त्यासाठी परस्परांना दोष देत आहेत. आता या‎ट्रोल्सविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. हे‎कायमचे थांबवले पाहिजे. द्वेष पसरवणे हा नव्या‎भारताचा चेहरा बनत चालला आहे, पण आपण अशा‎भारताच्या बाजूने नाही. आपण त्यावर विश्वास ठेवत‎नाही आणि समाज म्हणून ते स्वीकारणारही नाही. हा‎वाद केवळ सामन्यातील एका हस्तांदोलनाचा आहे.‎प्रत्येक खेळात कुणीतरी जिंकतो, कुणीतरी हरतो. त्याचा‎कुणाच्या कुटुंबाशी, पत्नीशी किंवा मुलीशी काही संबंध‎नाही. आणि जो कोणी ही मर्यादा ओलांडतो, तो भ्रमित‎आहे किंवा सभ्य समाजात राहण्यास योग्य नाही.‎ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता असे वाटू‎लागले आहे की, त्यांना काहीही बोलण्याचा आणि‎त्यातून सुटून जाण्याचा अधिकार आहे. काळाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ओघात सोशल मीडिया अनियंत्रित शिवीगाळीचे मैदान‎बनले आहे. एका पातळीवर ते अश्लील आणि घृणास्पद‎आहे, तर दुसऱ्या पातळीवर अत्यंत चिंताजनक आहे. हे‎लोकांच्या मनातील खोल अस्वस्थता आणि राग उघड‎करते. आपण ही परिस्थिती खूप काळ चालू दिली आहे‎आणि सोशल मीडियावरील चर्चा आपण स्वतःला ज्या‎अवस्थेत अडकवले आहे, त्याचेच प्रतिबिंब बनली‎आहे. खऱ्या चाहत्यांनी आता याविरोधात उभे राहिले‎पाहिजे आणि हे थांबवले पाहिजे. चाहत्यांनी या‎परिस्थितीची गंभीरता समजून घेत द्वेषप्रदर्शन थांबवणे‎अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण म्हणतील की, हे‎आपल्या आयुष्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या सोशल‎मीडियाचे उपउत्पादन आहे. पण याविरोधात फारसे‎संघटित आंदोलन कधीच झाले नाही. एखाद-दुसरे‎वक्तव्य या समस्येचे समाधान करू शकणार नाही.‎यासाठी सामूहिक कारवाई आवश्यक आहे, तेव्हाच हे‎ट्रोल्स थांबतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही काय‎स्वीकारार्ह आहे आणि काय नाही, हे समजून घ्यावे‎लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ लोकांना आता काहीही बोलण्याचा‎आणि बोलून मोकळे होण्याचा हक्क‎असल्यासारखे वाटू लागले आहे, ही‎अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.‎कालांतराने सोशल मीडिया अनियंत्रित‎शिवीगाळीचे व्यासपीठ बनले आहे. ही‎चिंतेची बाब आहे.‎

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *