अहिल्यानगर: एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेतून एक अत्यंत संतापजनक, अमानुष आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि ज्ञानाची मंदिरासारखी जागा मानली जाते, परंतु येथील एका विकृत मानसिकतेच्या प्रिन्सिपलने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा येथील शाळेच्या प्रिन्सिपलने क्रूरपणे हाताचा चावा घेतला, एवढ्यावरच न थांबता त्याचा गळा दाबून त्याला तब्बल २० सेकंद हवेत उचलून धरल्याचा संतापजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित बालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बाल न्याय (Juvenile Justice Act) कायद्यान्वये कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित ८ वर्षांचा हा चिमुकल्या विद्यार्थी शाळेत शिकत असताना त्याच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले होते. ही संपूर्ण भांडणाची बाब त्या पीडित विद्यार्थ्याने न घाबरता आपल्या वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांना जाऊन सांगितली. वर्गशिक्षिकेने तात्काळ या प्रकारची दखल घेत शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांना थेट वर्गात बोलावून घेतले. प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे वर्गात आल्यानंतर त्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर प्रिन्सिपलचा संताप अनावर झाला आणि त्यांनी "भांडण कसे करतात हे आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो," असे अजब आणि विकृत उत्तर देत त्या निष्पाप चिमुकल्याचा अचानक गळा धरला. गळा धरून त्याला वर उचलले आणि जोपर्यंत १ ते २० आकडे मोजले जात नाहीत, तोपर्यंत (तब्बल २० सेकंद) त्याला तसेच हवेत टांगून ठेवले. त्यानंतर त्याला खाली उतरवत त्याच्या हाताचा अत्यंत जोरात चावा घेतला, ज्यामुळे विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.
शाळा सुटल्यानंतर हा चिमुकला विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या शरीरावरील मारहाणीच्या आणि चाव्याच्या खुणा पाहून पालकांना मोठा धक्का बसला. मुलाच्या वागण्यातून आणि त्याच्या शरीरावरील जखमांवरून पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा संपूर्ण भयानक प्रकार उघडकीस आला. आपल्या लाडक्या मुलावर झालेल्या या अमानुष अत्याचाराने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर संतप्त पालकांनी प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांना फोनवरून संपर्क साधून या प्रकाराचा जाब विचारला. त्यावर प्रिन्सिपलने उडवाउडवीची उत्तरे देत, "माझ्याकडून चुकीने ही भयंकर घटना घडली आहे, मी तुम्हाला लेखी माफीनामा पाठवतो, कृपया मला तुमचा पत्ता द्या," अशी भाषा वापरून हे गंभीर प्रकरण दाबण्याचा आणि मिटवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, एवढ्या लहान बालकाचा असा विकृतपणे आणि अमानुषपणे छळ करणे हा अत्यंत गंभीर व अक्षम्य अपराध असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व विकृत मानसिकतेच्या प्रिन्सिपलवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी आक्रमक मागणी पीडित विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अहिल्यानगर जिल्ह्यातील पालक वर्गामध्ये आणि नागरिकांमध्ये प्रिन्सिपलविरोधात तीव्र संतापाची व रोषाची लाट उसळली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




