25-Year-Old Youth Dies by Suicide at Lodge, Relatives Suspect Foul Play.

पाचोरा हादरले! लॉजवर तरुणाची आत्महत्या, साखरपुडा झालेला असताना प्रियसीसह टोकाचे पाऊल; नातेवाईकांचा घातपाताचा संशय.

25-Year-Old Youth Dies by Suicide at Lodge, Relatives Suspect Foul Play.
जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा येथील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव रवींद्र संजय मोरे (वय २५) असे असून, तो पाचोरा शहरात रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्रचा विवाह महिन्याभरापूर्वीच ठरला होता आणि त्याचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. मात्र, त्याचे प्रेम दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर होते, ज्यामुळे तो तणावाखाली होता. गुरुवारी सकाळी १० वाजता रवींद्र आणि संबंधित अल्पवयीन मुलगी पाचोरा येथील एका लॉजवर गेले होते.
तिथे गेल्यानंतर त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि पंख्याला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फास तुटल्याने मुलगी सुदैवाने वाचली, परंतु रवींद्रचा मृत्यू झाला.

घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रवींद्रला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर रवींद्रच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा संशय उपस्थित केला आहे.
त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *