आज सर्वत्र ‘कॉक्रोच’ या शब्दाची चर्चा आहे. मात्र, हा शब्द आपल्या राजकीय शब्दकोशाचा भाग होण्याच्या खूप आधीपासून मी त्याचा वापर करत आलो आहे. देव न करो, पण उद्या एखाद्या अणुस्फोटात जग नष्ट झाले तरी फक्त कॉक्रोचच जिवंत राहतील. एका महान ‘सर्व्हायव्हर’पासून राजकीय प्रतिकाराच्या प्रतीकापर्यंत झुरळांनी मोठा प्रवास केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी किंवा सीजेपीचा उदय हा त्या व्यवस्थेविरोधातील वाढत्या जनआक्रोशाचे प्रतीक आहे. ही व्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की, आंदोलनकर्त्यांना लोकशाहीवरील धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एका किड्याच्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागत आहे. आपण अशा काळात जगत आहोत. त्यात नेते सम्राटांसारखे वागू लागले आहेत आणि विरोधक कोणतेही विश्वासार्ह आव्हान उभे करू शकत नाहीत. याच पोकळीत कॉक्रोच रांगत प्रवेश करतो- असा एक जीव, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा आणि भीती बाळगायला शिकवले गेले आहे. पण तो प्रत्येक संकटात जिवंत राहण्याची क्षमता ठेवतो. हे विशेष आहे की, एखाद्या तुलनेने अपरिचित राजकीय संवाद रणनीतिकाराने अमेरिकेतील एका विद्यापीठात बसून सुरू केलेले एक व्यंगात्मक आंदोलन अचानक सत्तेच्या दालनांत अस्वस्थता निर्माण करू लागते. शेवटी एका शक्तिशाली राष्ट्राला सरन्यायाधीशांच्या अनावश्यक टिप्पणीमधून निर्माण झालेल्या ऑनलाइन आंदोलनाची चिंता का वाटावी? भारतातील बेरोजगार तरुणांची जणू खिल्ली उडवत सरन्यायाधीशांनी नकळत एका तीव्र प्रतिक्रियेला जन्म दिला : राग, दुरावा आणि व्यंगाने प्रेरित डिजिटल बंड. त्यानंतर लाखो भारतीय तरुण त्याभोवती एकत्र आले आहेत. या संपूर्ण घटनेला विशेष रंजक बनवणारी गोष्ट म्हणजे सीजेपी हा प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष नाही. त्याला नेता नाही. कार्यालय नाही. कार्यकर्त्यांचे जाळे नाही. संघटनात्मक रचना नाही. 1.5 अब्ज लोकसंख्या आणि विलक्षण विविधता असलेल्या या देशात केवळ सायबर-स्पेसमध्ये अस्तित्वात असलेल्या एका आंदोलनामुळे तत्त्वतः विद्यमान व्यवस्थेला धोका वाटू नये. तरीही धोका का जाणवत आहे? सीजेपीवर विदेशी निधीतून चालवल्या जाण्याचा आरोप केला जात आहे. त्याचे अनेक समर्थक पाकिस्तानी असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्याचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले जात आहेत. काहींनी तर त्याला आम आदमी पक्षाचा प्रॉक्सी ठरवण्याचाही प्रयत्न केला. हे सर्व एक प्रकारची संशयी मानसिकता उघड करते. या घबराटीमागे अनेक कारणे आहेत. सर्वांत पहिले म्हणजे हा मोठ्या प्रमाणात ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’चा काळ आहे. या काळातील राज्यकारभार चोवीस तास सुरू असलेल्या जाहिरात मोहिमेसारखा वाटतो : कामगिरीचा प्रचार करा, अपयश दडपून टाका, घोषणा बदला आणि पुढे निघा. कोट्यवधी नोकऱ्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेपरफुटी सुरूच आहेत- पण ‘नॅरेटिव्ह मॅनेजमेंट’ हे निश्चित करते की, लोकधारणा कामगिरीवर भारी पडावी. अशा वेळी इंटरनेटवरील हे कॉक्रोच ठरवून दिलेल्या पटकथेचे पालन करण्यास नकार देत आहेत. ही बाब अस्वस्थ करणारी ठरू शकते. दुसरे म्हणजे तरुणांचा रोष निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उच्च जीडीपी वाढीचे आकडे आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या गदारोळामागे अशी एक पिढी आहे. ती खोल असुरक्षिततेशी झुंज देत आहे. लाखो सुशिक्षित तरुण कमी होत चाललेल्या रोजगार संधी, वाढता परीक्षेचा ताण आणि अशी अर्थव्यवस्था अनुभवत आहेत. त्यात कायमस्वरूपी नोकरी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेकांसाठी ही निराशा आता कायमस्वरूपी झाली. त्यांना वाटते की, राजकारणी त्यांना फक्त निवडणुकांच्या वेळी पाहतात आणि ते आंदोलन करतात. तेव्हाच त्यांचे ऐकतात. हा रोष केवळ वैचारिक नाही, तर अनेक अर्थांनी वैयक्तिकही आहे. हे अलीकडील निवडणुकांतही स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः तामिळनाडूमध्ये. तेथे विजय यांच्या लोकप्रियतेने पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या युवा मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनली आहे. आणि लक्षात ठेवा. विडंबन नेहमीच एक राजकीय शस्त्र ठरले आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विनोद आणि व्यंगासमोर आश्चर्यकारकरीत्या असुरक्षित ठरतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ‘कॉक्रोच’ला कोण घाबरतेय आणि का?संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनत चालली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




