नवी दिल्ली/मुंबई: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या तणावाचा थेट फटका भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही सलग तिसरी दरवाढ असल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या नव्या दरवाढीमुळे भाजीपाला, वाहतूक आणि पर्यायाने रोजच्या जगण्याचा खर्च वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
किती झाली दरवाढ?
नव्याने झालेल्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ मे रोजी इंधनाचे दर थेट ३ रुपयांनी वाढले होते, तर त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा एकदा ९० पैशांची वाढ करण्यात आली होती. अवघ्या १० दिवसांत देशात पेट्रोल-डिझेल तब्बल ५ रुपयांच्या आसपास महागले आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील नवे दर:
दिल्ली: दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी महागून ९९.५१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१ पैशांच्या वाढीसह ९२.४९ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
मुंबई: मुंबईत पेट्रोलचा दर १०८.४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९५ रुपये प्रति लिटर झाला आहे.
कोलकाता: कोलकातामध्ये पेट्रोल ११०.६ रुपये आणि डिझेल ९७ रुपये प्रति लिटरवर गेले आहे.
चेन्नई: चेन्नईत पेट्रोल १०५.३ रुपये तर डिझेल ९६.९ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
इंधन महागण्याचे मुख्य कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष तसेच पश्चिम आशियातील (West Asia) भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सातत्याने चढ्या राहिल्या आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर व्यापार करत आहे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल ८८ टक्के कच्चे तेल आयात करतो. तेल पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर झालेल्या परिणामांमुळे आयातीचा खर्च प्रचंड वाढला असून, देशांतर्गत तेल कंपन्यांनी हा बोजा आता थेट ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. सलग होत असलेल्या या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाचे मासिक आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



