
Pune : महाराष्ट्रात राजकीय पक्षांची आयपीएल करून ठेवली आहे. कोण कुठून खेळतो आहे हेच कळत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका केली. राजकारणात झालेला चिखल स्वच्छ करण्याची गरज आहे. ती संधी या निवडणुकीने दिली आहे. हेच लोक पुन्हा निवडून आल्यास आपण करतो ते बरोबर असा त्यांचा समज होईल. हा राजकीय खेळ थांबवला पाहिजे. एकदा मनसेला संधी देऊन बघा, अशी सादही त्यांनी घातली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे, अनिल शिदोरे या वेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की हडपसर मतदारसंघ २००९ मध्ये झाला. गावे महापालिकेत आली. मात्र, गावे होती तीच बरी होती, असे कित्येक लोक सांगतात. आज वाहतूक कोंडी प्रचंड आहे. शहराला काहीही आकार-उकार नाही. जनतेला काय हवे आहे, त्यानुसार विकास होतच नाही. पुण्याचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही, हे मी २५-३० वर्षे पुण्यात येऊन सांगत आहे. परदेशात लोकांचा विचार करून शहरे घडवली जातात.
मात्र, आपल्याकडे केवळ ठेकेदारीतून टक्केवारी घेतली जाते. पुढील पिढ्यांना चांगले आयुष्य मिळाले पाहिजे हा विचार कोणी करत नाही. माझ्या हाती सत्ता दिल्यास पुन्हा याच माणसाला सत्ता द्यावी असे वाटेल, असे काम करून दाखवेन. महाराष्ट्राचा विकास आराखडा करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे. मला मुख्यमंत्री पदाचा सोस नाही. छत्रपती शिवाजी महाराज, मराठेशाहीचे गतवैभव महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. तरुणांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे.
|
|
जातीपातीच्या खेळात महाराष्ट्राचा सत्यानाश झाला आहे. जातीपातींचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाले. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जातीपातींचे राजकारण होत आहे. महापुरुष जातींमध्ये विभागले गेले आहेत. सिमी, आयसिसचे अतिरेकी हडपसरमधील मोहल्ल्यांत सापडले आहेत. रोजगार, नोकऱ्या नाहीत, शाळांमध्ये प्रवेश नाहीत, रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे जनतेसाठी जो रस्त्यावर उतरतो, त्याला मतदान करणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
आज तरुणांना नोकऱ्या नाहीत, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पालखी मार्गावर वारकरी भवन झाले पाहिजे. स्वतंत्र महापालिका झाली पाहिजे. समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. ही कामे विद्यमान आमदार सोडवू शकले नाहीत. मात्र आमदार म्हणून संधी मिळाल्यास सर्व कामे मार्गी लावणार आहे, असे बाबर यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
महाराष्ट्र
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- अमरावती: ना डॉक्टर, ना नर्स, ना रुग्णवाहिका.. उपचाराविना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात मोठा उद्रेक आणि तीव्र रोष!
- गोवा: फक्त भाजप सरकारच करू शकते महिलांचे खऱ्या अर्थाने कल्याण; गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे महिला सक्षमीकरणावर मोठे वक्तव्य!
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




