पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान संशयास्पद मृत्यू झाला आहे.
प्रियांशी जितेंद्र बागडे (रा. सुपे, अहिल्यानगर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची तीव्र दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला तात्काळ 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. नेमके काय घडले?प्रियांशीला जन्मापासूनच मोतीबिंदू आणि तिरळेपणाचा त्रास होता. तिच्यावर यापूर्वी वयाच्या पहिल्या वर्षी एक शस्त्रक्रिया झाली होती. पुढील उपचारासाठी तिला १८ मे रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेले तिचे सर्व वैद्यकीय अहवाल (Medical Reports) सामान्य आले होते आणि तिला तज्ज्ञांनी 'फिट' घोषित केले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी सकाळी ८ वाजता प्रियांशीला हसत-खेळत ऑपरेशन थिएटरमध्ये (OT) नेण्यात आले. मात्र, शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच डॉक्टरांनी तिच्या वडिलांना आत बोलावले. प्रियांशीच्या तोंडातून अचानक रक्त आले असून तिचे हृदय बंद पडल्याचे (Cardiac Arrest) डॉक्टरांनी सांगितले. तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु दुपारी ११:३० च्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आले.
एका साध्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान अंतर्गत रक्तस्त्राव आणि हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो, असा संतप्त सवाल तिच्या पालकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेची नोटीस आणि २४ तासांचा अल्टिमेटमया धक्कादायक घटनेनंतर प्रियांशीच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी रुग्णालय प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. प्रियांशीच्या उपचाराशी संबंधित सर्व वैद्यकीय कागदपत्रे, केस पेपर्स आणि अंतर्गत अहवाल २४ तासांच्या आत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. पोलीस तपास आणि ससूनची चौकशी समितीया प्रकरणी प्रियांशीच्या वडिलांनी अलंकार पोलीस ठाण्यात रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सुमारे २० लोकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. प्रियांशीचे शवविच्छेदन (Post-Mortem) ससून रुग्णालयात करण्यात आले असून, ससून प्रशासन या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ४ सदस्यांची विशेष वैद्यकीय समिती (Medical Negligence Board) नेमणार आहे. या समितीच्या अंतिम अहवालानंतरच रुग्णालयाविरुद्ध रीतसर एफआयआर (FIR) दाखल केला जाईल.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने ही घटना 'अतिशय दुर्दैवी' असल्याचे म्हटले असून अंतर्गत चौकशी सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस आणि वैद्यकीय तपासणीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




