टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील मोठा विक्रम स्कॉटलँडच्या खेळाडूने मोडला, झालं असं की...Image Credit source: PTI
Michael Leask World Record: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना स्कॉटलँड आणि इटली यांच्यात पार पडला. या सामन्यात स्कॉटलँडचं पारडं जड राहिलं. त्यांनी इटलीला 73 धावांनी पराभूत केलं. खरं नाणेफेकीचा कौल गमावल्याने स्कॉटलँडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ 16.4 षटकात 134 धावा करू शकला. या विजयाचा मानकरी ठरला तो अष्टपैलू मायकल लीक्स… त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या पुढे इटली संघाने नांगी टाकली. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदना दिलं. त्याने नाबाद 22 धावांसह 4 षटकात 17 धावा देत 4 गडी बाद केले. या कामगिरीमुळेच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. इतकंच काय तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंदही झाली.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे. लीक्सने इटलीविरूद्ध 5 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. यात त्याने 2 षटकार आणि 2 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 440चा होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कमीत कमी 20 धावांची खेळी करताना हा सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन स्मिथच्या नावावर होतो. त्याने 2007 मध्ये बांगलादेशविरूद्ध 7 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.
Highest strike rate in an ICC Men’s T20WC innings (min. 20 runs):
440.00 – Michael Leask 22* (5) for SCO 🏴 vs ITA 🇮🇹, 2026* 414.28 – Dwayne Smith 29 (7) for WI 🌴 vs BAN 🇧🇩, 2007 362.50 – Yuvraj Singh 58 (16) for IND 🇮🇳 vs ENG 🏴, 2007#T20WC2026
— The Stats Kid (@TheStatsKid1523) February 9, 2026
तसं पाहिलं तर 50 पेक्षा जास्त धावा करताना सर्वाधिक स्ट्राईक रेट हा सिक्सर किंग युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 16 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 362.5 चा होता. आतापर्यंत हा विक्रम कायम आहे. अजूनही हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. त्याने 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. यात त्याने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.
बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर स्कॉटलँडची एन्ट्री झाली. त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध गमावला. पण इटलीला पराभूत करताचा पुन्हा एकदा गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. इंग्लंडपेक्षा स्कॉटलँडचा नेट रनरेट चांगला असल्याने दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिज आहे.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
- सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्या ट्रकला धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel


