23-Year-Old Woman Jumps into Well Over Dowry Torture; Leaves Emotional Final Note!

काळजाचा थरकाप! हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ; २३ वर्षीय विवाहितेची चिठ्ठी लिहून विहिरीत उडी!

23-Year-Old Woman Jumps into Well Over Dowry Torture; Leaves Emotional Final Note!अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून प्रिया शुभम ढगे (वय २३) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

ही धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी प्रियाचा गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक
आणि मानसिक छळ केला जात होता. आत्महत्येपूर्वी प्रियाने एक भावूक मेसेज लिहिला असून, त्यात तिने आपल्या सासूमुळे होणारा त्रास आणि पतीकडून न मिळालेली साथ याचा उल्लेख केला आहे.

"मी खूप सहन केलं, आता मला काहीच नकोय,"
असे म्हणत तिने आपल्या चिमुरड्या लेकीचा, श्रेयाचा सांभाळ करण्याची विनंतीही पत्रात केली आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *