नाशिक: नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यावर 'मिशन कन्व्हर्जन'ची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचा संशय विशेष तपास पथकाने (SIT) व्यक्त केला आहे. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतर निदा खान सध्या फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी राज्यभरात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
विशिष्ट कर्मचाऱ्यांना 'लक्ष्य' करण्याचा डाव?
मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार, निदा खान हिने टीसीएसमधील काही पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि त्यांना धमकावणे असे गंभीर आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. एसआयटीच्या मते, निदा खान ही केवळ या कटाचा भाग नव्हती, तर विशिष्ट व्यक्तींना शोधून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे काम तिच्याकडे सोपवण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय कनेक्शनची शक्यता
या प्रकरणाची सुरुवात २ एप्रिल रोजी एका पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांना मिळालेल्या डिजिटल पुराव्यांवरून आणि आरोपींच्या संभाषणावरून या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील जाळ्याशी जोडलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचाही पाठपुरावा
दुसरीकडे, नाशिकमधीलच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपासही अंतिम टप्प्यात आला आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या नऊ गुन्ह्यांमध्ये खरात विरोधात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याची तयारी एसआयटीने केली आहे. पीडितांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील आठवड्यात न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे.
प्रशासन सतर्क, मोठ्या खुलाशांची शक्यता
या दोन्ही संवेदनशील प्रकरणांमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या तांत्रिक पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासत असून, निदा खान हिला अटक झाल्यानंतर या 'धर्मांतर रॅकेट'मधील आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




