पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करणाऱ्या आणि तिचे तुटलेले शिर हातात घेऊन परिसरात फिरणाऱ्या रामचंद्र शेहू चव्हाण (वय ६३) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला असून, आरोपीला जन्मठेपेसह ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
नेमकी घटना काय होती?
९ ऑक्टोबर २०१५ रोजी कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली होती. मूळचा कर्नाटकचा असलेला आणि पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा रामचंद्र चव्हाण याचे पत्नी सोनाबाई (वय ५५) हिच्यासोबत चारित्र्याच्या संशयावरून नेहमी भांडण होत असे. या रागातून त्याने कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने लाकडी ओंडक्यावर पत्नीचा मृतदेह ठेवून तिचे दोन्ही हात-पाय आणि शिर धडावेगळे केले.
हातात शिर घेऊन फिरताना पकडले
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि पत्नीचे शिर हातात घेऊन कात्रज तलावाच्या दिशेने निघाला होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदाराने त्याला संशयास्पद स्थितीत पाहून रोखले आणि त्याच्या हातातील शिर पाहून तातडीने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीची सून सुनीता चव्हाण हिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
जपानमधून येऊन नोंदवली साक्ष
या खटल्यात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी २४ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीची सून, शेजारी आणि एका शाळकरी मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
महत्त्वाची साक्ष: शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना बाल्कनीतून पाहिली होती आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रणही केले होते. नोकरीनिमित्त जपानला स्थायित्त झालेल्या या साक्षीदाराने विशेषत्वाने भारतात येऊन न्यायालयात आपली साक्ष नोंदवली.
चिमुकलीची ओळख: शाळेत जाण्यासाठी घराबाहेर थांबलेल्या एका ९ वर्षांच्या मुलीनेही आरोपीला ओळखले.
न्यायबाह्य कबुली: घटनेनंतर आरोपी हातात शिर घेऊन जात असताना एका चहाविक्रेत्या महिलेने त्याला विचारले की, 'अण्णा, कुठे बकरू कापले?'. त्यावर त्याने थंडपणे 'बायकोला मारले' अशी कबुली दिली होती, जी न्यायालयात सिद्ध झाली.
न्यायालयाने आरोपीचा क्रूरपणा आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे परिसरात पुन्हा एकदा या जुन्या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

