पुणे, मुळशी:
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आईस्क्रीम विकण्याच्या बहाण्याने आलेल्या एका नराधमाने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पिंटू शिवकुमार (वय २८, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार सूस, पुणे) हा दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून गावात आईस्क्रीम विकण्यासाठी आला होता. पीडित मुलगी तिच्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी आरोपीच्या गाडीजवळ गेली होती. यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत, आरोपीने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्याकडे ओढले आणि तिचा विनयभंग केला.
गावकऱ्यांनी दाखवले धाडस:
या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली आणि तिने तात्काळ घरात धाव घेऊन पालकांना सर्व हकीगत सांगितली. आपली मुलगी संकटात असल्याचे समजताच पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. गावकऱ्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिस कारवाई:
या घटनेप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पिंटू शिवकुमार याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत कारवाई करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे मुळशी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहर
- पुणे: बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
महाराष्ट्र
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



