Police Catch Absconding Rape Suspect in Latur; Major Breakthrough in Long-Standing Case

कोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; एका महिलेसह दोघांना अटक

Police Catch Absconding Rape Suspect in Latur; Major Breakthrough in Long-Standing Case पुणे: शहरातील कोंढवा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४५ वर्षीय महिलेसह एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त केला आहे.
यासमीन करीम शेख (वय ४५) आणि आमीर समीर शेख (वय १९, दोघेही रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सापळा रचून कारवाई
कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात हे दोघे काही परिचितांना गांजा विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचला.
संशयास्पदरित्या आढळलेल्या या दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गांजा साठा सापडला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *