मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा मरीन ड्राईव्हवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. कृष्णा देसाई असे या मृत तरुणाचे नाव असून तो मुलुंडचा रहिवासी होता. या अपघातामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकी घटना काय?
कृष्णा रविवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याचे आई-वडील काळजीत होते. त्यांनी कृष्णाच्या मोबाईलवर सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. रात्रभर पालकांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सोमवारी सकाळी पोलिसांकडून अपघाताची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
वडिलांनी हट्टाने घेतली होती बाईक:
मिळालेली माहिती अशी की, कृष्णा हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने आपल्या वडिलांकडे 'केटीएम' (KTM) बाईक घेण्यासाठी हट्ट धरला होता. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी वडिलांनी त्याला बाईक घेऊन दिली होती. मुलगा बाईक घेऊन जास्त दूर जाऊ नये म्हणून वडील नेहमी टाकीत पेट्रोल कमी ठेवत असत. रविवारीही त्यांनी पेट्रोलसाठी फक्त २०० रुपये दिले होते, मात्र तरीही कृष्णा मुंबईच्या दुसऱ्या टोकाला मरीन ड्राईव्हपर्यंत पोहोचला.
अपघाताचा तपशील:
पहाटे साडेपाचच्या सुमारास मरीन ड्राईव्ह परिसरात कृष्णाच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात कृष्णासोबत कफ परेड येथील रहिवासी असलेली चांदणी नावाची तरुणीही होती. या भीषण धडकेत कृष्णाचा मृत्यू झाला, तर तिथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले किशोर लामणे या ज्येष्ठ नागरिकाचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला. लामणे हे गिरगावचे रहिवासी होते आणि गेली अनेक वर्षे तिथे व्यायामासाठी येत असत.
पोलीस तपास:
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा आणि चांदणी यांची ओळख कशी झाली आणि रात्रभर कृष्णा कुठे होता, याचा तपास पोलीस करत आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा शेवट अशा प्रकारे मृत्यूत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
महाराष्ट्र
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
- तुमची ट्रेन चुकली? काळजी नको, तिकीटाचे पैसे परत मिळवू शकता! जाणून घ्या काय आहेत नियम आणि प्रक्रिया.

























Subscribe to my channel

