ठाणे:
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता ठाण्यातून फसवणुकीचा त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला 'दीक्षित बाबा' म्हणवून घेणाऱ्या मंजूनाथ शेट्टी याने अनेकांना काळ्या जादूची भीती दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, पूजेच्या नावाखाली लुटलेले हे पैसे हा भोंदू बाबा गोव्यातील कॅसिनोमध्ये उडवत असल्याचे तपासात उघड झाले असून, त्याला आता 'कॅसिनो बाबा' म्हणून ओळखले जात आहे.
फसवणुकीची पद्धत (Modus Operandi):
मंजूनाथ शेट्टी प्रामुख्याने श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांना आपले लक्ष्य बनवत असे. "तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे," "तुमचा मृत्यू जवळ आला आहे," किंवा "अघोरी पूजा केल्यास गुप्त धन मिळेल," असे सांगून तो लोकांना जाळ्यात ओढायचा. मुले होत नसलेल्या जोडप्यांनाही तो पूजेचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळायचा.
पूजा गोव्यात, मजा कॅसिनोत:
हा भोंदू बाबा इतका हुशार होता की, तो पीडितांना अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने गोव्याला घेऊन जायचा. मात्र, तिथे कोणतीही पूजा न करता तो पीडितांकडून घेतलेल्या पैशांवर गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि कॅसिनोमध्ये मजा मारत असे. पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, त्याने एका रात्रीत तब्बल १४ लाख रुपयांचे बिल एका कॅसिनोत भरले होते.
आलिशान जीवनशैली आणि परदेशी महिलांचा वावर:
तपासादरम्यान पोलिसांना या बाबाच्या 'हाय-प्रोफाईल' जीवनशैलीचे धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. हा बाबा नेहमी विमानाने प्रवास करायचा आणि त्याच्यासोबत रशियन तसेच कझाकिस्तानमधील महिलांचा वावर असायचा. जेव्हा पोलिसांनी त्याला तपासासाठी गोव्यातील त्याच कॅसिनोमध्ये नेले, तेव्हा तिथले कर्मचारीही त्याचा हा खरा अवतार पाहून थक्क झाले.
पोलीस कारवाई आणि रॅकेट:
या मोठ्या रॅकेटमध्ये गोव्यातील एका कॅसिनो मॅनेजरचाही सहभाग असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. बाबाच्या बँक खात्यात विविध लोकांकडून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक पुरावे ठाणे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात अजून किती लोकांची फसवणूक झाली आहे आणि यात इतर कोणाचे लागेबांधे आहेत, याचा सखोल तपास ठाणे पोलीस करत आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




