कोल्हापूर: कोल्हापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात एका खासगी सावकाराने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी संशयित आरोपी अमित सावंत याला अटक केली असून, त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे २०० ते ३०० अश्लील व्हिडिओ असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय? पीडित महिलेने घरगुती अडचणींमुळे अमित सावंत याच्याकडून १० टक्के व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. या पैशांची नियमित परतफेड करणे महिलेला शक्य झाले नाही. हीच संधी साधून सावंतने महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी केली. महिला घरी एकटी असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले.
ब्लॅकमेलिंग आणि दहशत: हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सावंतने पीडितेला वारंवार हॉटेल आणि कारमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, नोव्हेंबर २०२५ पर्यंत पीडितेने व्याजासह संपूर्ण २ लाख रुपये परत केले होते. तरीही आरोपीने अधिक पैशांची मागणी सुरूच ठेवली आणि महिलेच्या अश्लील व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल करणे थांबवले नाही.
कुटुंबालाही मारहाण: आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ एका कार मालकाला पाठवून तिची बदनामी केली. जेव्हा पीडितेच्या जावयाने या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सावंतला गाठले, तेव्हा त्यालाही हॉटेलवर बोलावून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर या छळाला कंटाळून महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मोठ्या रॅकेटची शक्यता: पीडित महिलेने दावा केला आहे की, आरोपीच्या मोबाईलमध्ये शेकडो अश्लील व्हिडिओ आहेत आणि या कृत्यात त्याच्या मित्रांचाही सहभाग असू शकतो. "इतर महिलांनी या जाळ्यात अडकू नये, यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी," अशी मागणी पीडितेने केली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरात खासगी सावकारी आणि त्यातून होणाऱ्या शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


